मुंबई -टाळेबंदीमुळे विविध भागात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी भारतीय रेल्वेकडून 1 मे, 2020 पासून देशभरात 4 हजार 621 श्रमिक विशेष गाड्या चालवण्यात आल्या होत्या. 1 मे, 2020 ते 31 ऑगस्ट 2020 पर्यंत देशातील विविध राज्यातून एकूण 63 लाख 19 हजार मजुरांनी आपले गाव, घर गाठले आहे. कोरोना आणि इतर आजारामुळे 97 मजुरांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे भारतीय रेल्वेच्या इतिहासात श्रमिक रेल्वेमध्ये देशभरात 36 मुलांनी जन्म दिला आहे.
उत्तर प्रदेशसाठी सर्वाधिक धावल्या श्रमिक रेल्वे
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रेल्वेची प्रवासी वाहतूक 23 मार्च, 2020 पासून बंद करण्यात आली होती. विविध राज्यात अडकलेल्या मजुरांना घर वापसीसाठी भारतीय रेल्वेकडून श्रमिक रेल्वे चालविण्यात आल्या. भारतीय रेल्वेने विविध राज्यात 31 ऑगस्टपर्यंत 4 हजार 621 श्रमिक रेल्वे चालविल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त श्रमीक 1 हजार 682 श्रमिक रेल्वे एकट्या उत्तर प्रदेश राज्यातील मजुरांसाठी धावल्या आहेत.
श्रमिक रेल्वेची आकडेवारी
देशातील पाच राज्यातून मोठ्या प्रमाणात श्रमिक रेल्वे चालविण्यात आलेले आहे. ज्यामध्ये गुजरात 1 हजार 26, महाराष्ट्र 802, पंजाब 416, बिहारमधून 294 आणि उत्तर प्रदेशातून 294 श्रमिक गाड्या चालविण्यात आलेल्या आहेत. तसेच ज्या पाच राज्यासाठी देशातील प्रत्येक राज्यातून श्रमिक रेल्वे धावली. त्यामधील पहिला क्रमांक उत्तर प्रदेशाचा आहे. उत्तर प्रदेशसाठी 1 हजार 682, बिहार 1 हजार 495, झारखंड 197, ओडिशा 187 आणि पश्चिम बंगालसाठी 156 श्रमिक रेल्वे सोडण्यात आलेल्या आहेत.
श्रमिक रेल्वेसाठी 2 हजार 142 कोटींचा खर्च
भारतीय रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रमिक रेल्वे चालवण्यासाठी 2 हजार 142 कोटी रुपयांच्या खर्च आलेला आहे. त्यातून आतापर्यंत 429 कोटींचा महसूल भारतीय रेल्वेला मिळालेला आहे. यामध्ये सर्वाधिक गुजरात राज्यातून 15 लाख मजुरांच्या वाहतुकीसाठी 102 कोटी रुपये भारतीय रेल्वेला मिळाले आहे. तर महाराष्ट्र राज्यातून 12 लाख मजुरांच्या वाहतुकीसाठी 85 कोटी रुपये मिळाले आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मजुरांचे श्रमिक रेल्वेचे 15 टक्के भाडे राज्य सरकार देणार असून उर्वरित 85 टक्के भाडे रेल्वेकडून भरण्यात येणार आहे.
श्रमिक रेल्वेमध्ये 97 मजुरांचा मृत्यू