महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात 5 हजार 369 नव्या रुग्णांची वाढ, 113 रुग्णांचा मृत्यू - Maharashtra latest corona news

राज्या आज 5 हजार 369 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 113 जणांना मृत्यू झाला आहे.

edited photo
संपादित छायाचित्र

By

Published : Nov 1, 2020, 8:28 PM IST

मुंबई - आज (दि. 1 नोव्हेंबर) राज्यात 5 हजार 369 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून आज 113 रुग्णांचे कोरोनाविरोधात लढा देताना मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 44 हजार 24 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.61 टक्के एवढा आहे. राज्यात आज (दि. 1 नोव्हेंबर) 3 हजार 726 रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण 15 लाख 14 हजार 79 कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.92 टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 90 लाख 24 हजार 871 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16 लाख 83 हजार 775 (18.66 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 25 लाख 44 हजार 799 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये (गृहविलगीकरणात) आहेत तर 12 हजार 230 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत. राज्यात सध्या 1 लाख 25 हजार 109 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

हेही वाचा -मुंबईत उद्यापासून २४४ दवाखाने, रुग्णालयांमध्ये मोफत कोरोना चाचणी

ABOUT THE AUTHOR

...view details