मुंबई-सातवा वेतन आयोग लागू करावा आणि अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी सोमवारी राज्यातील सुमारे 450 वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) संपावर जाणार आहेत. राज्यातील 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील हे डॉक्टर असून उद्या सकाळी 8 ते मंगळवारी सकाळी 8 असा एक दिवसाचा लाक्षणिक संप ते करणार आहेत. दरम्यान जे जे रुग्णालय प्रशासनाने संप केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मात्र या कारवाईच्या इशाऱ्यानंतरही संपाच्या भूमिकेवर हे डॉक्टर ठाम आहेत.
1 जानेवारीपासून आंदोलन सुरू, पण सरकारचा मात्र कानाडोळा-
18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सुमारे 450 अस्थायी वैद्यकीय अधिकारी सेवा देत आहेत. मात्र या डॉक्टरांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला केवळ ते कायमस्वरूपी सेवेत नसल्याने मिळत नाही. तर हे डॉक्टर वर्षानुवर्षे सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी या डॉक्टरांची आहे. यासाठी मागील कित्येक महिन्यापासून ते सरकारी स्तरावर पाठपुरावा करत आहेत. पण त्याकडे सरकारकडून दुर्लक्षच होताना दिसत आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी आता या डॉक्टरांनी आपले आंदोलन तीव्र केले आहे. त्यानुसार 1 जानेवारीपासून हे डॉक्टर काळ्या फिती लावून काम करत आहेत. 7 जानेवारी पर्यंत हे आंदोलन सुरू होते. मात्र त्यानंतर ही सरकार त्यांच्याकडे कानाडोळाच करत आहे. त्यामुळे आता त्यांनी उद्या संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना योध्याना सेवा समाप्तीच्या कारवाईचा इशारा-