मुंबई- राज्यात आज (दि. 28 मार्च) 40 हजार 414 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून एकूण बाधितांची संख्या 27 लाख 13 हजार 875 वर पोहोचली आहे. तर आज 108 कोरोनाग्रस्त उपचारादरम्यान दगावले असून आतापर्यंत एकूण 54 हजार 181 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
3 लाख 25 हजार 901 सक्रिय रुग्ण
आज (28 मार्च) 40 हजार 414 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. राज्यात सध्या 3 लाख 25 हजार 901 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहे.