मुंबई -राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामधील सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यूंची नोंद मुंबईत झालेली आहे. रविवारपर्यंत मुंबईतील सहा वॉर्ड कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. त्यात अंधेरी पूर्व आणि पश्चिम, धारावी, दादर, मालाड, भांडुप, कुर्ला या सहा विभागांचा समावेश आहे. येथील रुग्णसंख्या 4 हजारांवर गेली आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 41 दिवसांवर गेला आहे.
मुंबईत 11 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून जी-साऊथ वॉर्ड म्हणजेच वरळी, प्रभादेवी, धारावी, भायखळा हे विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. मात्र, धारावी, वरळी, भायखळा, मस्जिद बंदर या विभागांत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आले आहे. कोरोना रुग्णांवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळत असताना मुंबईत रोज हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. यामुळे मुंबईमधील कोरोना रुग्णांचा आकडा 76 हजार 294 वर पोहोचला आहे.
रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 41 दिवसांवर -