महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात 3 हजार 645 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 84 जणांचा मृत्यू - कोरोनाची ताजी आकडेवारी बातमी

राज्यात आज 3 हजार 645 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून एकूण बाधितांचा आकडा 16 लाख 48 हजार 665 वर पोहोचला आहे.

सांपादित छायाचित्र
सांपादित छायाचित्र

By

Published : Oct 26, 2020, 9:56 PM IST

मुंबई - राज्यात आज (दि. 26 ऑक्टोबर) 3 हजार 645 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून एकूण बाधितांचा आकडा 16 लाख 48 हजार 665 वर पोहोचला आहे. आज 84 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असून आजपर्यंतर 43 हजार 348 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज 9 हजार 905 रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे कोरोनावर मात करून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा 14 लाख 70 हजार 660 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.2 टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या राज्यात 1 लाख 34 हजार 137 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 86 लाख 45 हजार 195 नमुन्यांपैकी 16 लाख 48 हजार 665 नमुने पॉझिटिव्ह (19.07 टक्के) आले आहेत. राज्यात 25 लाख 30 हजार 900 लोक गृह विलगीकरणामध्ये आहेत तर 13 हजार 690 लोक संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत. राज्यात आज 84 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून एकूण 43 हजार 348 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.63 टक्के इतका आहे.

कधी किती रुग्ण आढळून आले -

राज्यात जून दरम्यान दिवसाला 5 हजार 400 रुग्ण आढळून येत होते. टाळेबंदीत शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या 10 हजार 500 वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या 20 हजार 400 वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या 24 हजार 800 वर गेली होती. मात्र, ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात 12 ऑक्टोबरला 7 हजार 89 रुग्ण, 13 ऑक्टोबरला 8 हजार 522 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर 19 ऑक्टोबरला 5 हजार 984 रुग्णांची नोंद झाली आहे.

हेही वाचा -ई टीव्ही भारत विशेष : मुंबईत सप्टेंबर महिन्यात खून, विनयभंग, बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details