महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत आतापर्यंत कोरोनाच्या 3 लाख 64 हजार चाचण्या, पालिकेकडून खुलासा

बृहन्मुंबई महापालिका हद्दीत पालिकेकडून आतापर्यंत 3 लाख 64 हजार 753 चाचण्या केल्या पालिका प्रकाशसनाकडून सांगण्यात आले.

BMC
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jul 9, 2020, 1:46 AM IST

मुंबई- बृन्मुंबई महापालिकेकडून कोरोनाची रुग्णसंख्या कमी दाखवण्यासाठी चाचण्या कमी प्रमाणात केल्या जातात, असा आरोप नेहमीच केला जातो. याबाबत खुलासा करत पालिकेकडून आतापर्यंत 3 लाख 64 हजार 753 चाचण्या केल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे पालिकेवर केल्या जाणाऱ्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे महापालिका प्रशासनाकडून नमूद करण्यात आले आहे.

कोरोना संसर्गाच्या सुरुवातीपासून चाचण्या करण्यावर भर दिला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद- आयसीएमार, केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या निर्देशांचे योग्य पालन करत प्रशासनाने चाचण्या केल्या आहेत. 3 फेब्रुवारी रोजी मुंबईत पहिली कोरोना चाचणी करण्यात आली तर दिनांक 11 मार्चला पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला. 3 फेब्रुवारी ते 6 मे या कालावधीमध्ये मुंबईत 1 लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला. 1 जूनला 2 लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला. तर 24 जूनला 3 लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. बुधवारपर्यंत (दि. 8 जुलै) एकूण 3 लाख 64 हजार 753 चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

महानगरपालिका प्रशासनाने अर्ध्या तासात निदान करु शकणारे ॲण्टीजेन टेस्ट युद्ध पातळीवर खरेदी करुन चाचण्यांना अधिक वेग दिला आहे. 3 जुलैपासून ॲण्टीजेन टेस्टचा उपयोग करण्यात येत असल्याने आता दैनंदिन चाचण्यांची संख्या ही 5 हजार 500 पर्यंत पोहोचली आहे. बुधवारी ( 8 जुलै) दिवसभरात सुमारे 5 हजार 483 चाचण्या झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी असलेली दैनंदिन सरासरी 4 हजार चाचण्यांची संख्या आता वाढली आहे. याचाच अर्थ प्रशासन चाचण्यांची संख्या कमी करत नाही किंवा लपवतही नाही, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

हेही वाचा -मुंबईत कोरोनाचे 1381 नवे रुग्ण, 62 मृत्यू; रुग्ण बरे होण्याचा दर 68 टक्क्यांवर

ABOUT THE AUTHOR

...view details