महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 14, 2021, 7:54 PM IST

Updated : Mar 14, 2021, 10:58 PM IST

ETV Bharat / state

राज्याची चिंता वाढवणारी आकडेवारी; रविवारी 16 हजाराहून अधिक कोरोनाबाधित

गेल्या 24 तासात राज्यात 8 हजार 861 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा कोरोनाबाधितांची संख्या जवळपास दुप्पट होऊ लागली आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण 23 लाख 14 हजार 413 रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबई
मुंबई

मुंबई- राज्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच असून आज रविवारी 16 हजार 620 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून 13 ते 15 हजारांच्या आसपास असणारा कोरोनाबाधितांचा आकडा आज साडेसोळा हजारांच्या पुढे गेल्याने चिंतेत भर टाकणारी आकडेवारी समोर येत आहे. गेल्या 24 तासात 50 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्युदर 2.28 टक्के एवढा आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.21% झाले आहे.

गेल्या 24 तासात राज्यात 8 हजार 861 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा कोरोनाबाधितांची संख्या जवळपास दुप्पट होऊ लागली आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण 23 लाख 14 हजार 413 रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 23 हजार 231 इतकी झाली आहे.

मुंबईत आज 1962 रुग्ण

मुंबईत आज 1962 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 43 हजार 947 वर पोहचला आहे. आज 7 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 531वर पोहचला आहे. 1 हजार 259 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 17 हजार 579 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 13 हजार 940 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्के

पुण्यात रविवारी 14 मार्च रोजी 858 जणांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. एकूण 17 कोरोनाग्रस्तांचा पुण्यात शनिवारी मृत्यू झाला. सध्या पुण्यातील विविध रुग्णालयांमध्ये 11 हजार 590 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. यापैकी 355 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पुण्यात आजपर्यंत एकूण 2 लाख 1661 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 4952 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. रविवारी एकूण 9122 नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद

  • मुंबई महानगरपालिका- 1962
  • ठाणे- 2163
  • ठाणे मनपा- 356
  • नवी मुंबई-224
  • कल्याण डोंबिवली- 417
  • पनवेल मनपा- 182
  • नाशिक-329
  • नाशिक मनपा-946
  • अहमदनगर- 285
  • अहमदनगर मनपा-151
  • धुळे मनपा- 160
  • जळगाव- 338
  • जळगाव मनपा- 246
  • नंदुरबार-170
  • पुणे- 673
  • पुणे मनपा- 1780
  • पिंपरी चिंचवड- 806
  • सोलापूर- 124
  • सातारा - 150
  • औरंगाबाद मनपा- 752
  • औरंगाबाद-151.
  • जालना-240
  • बीड - 260
  • नांदेड मनपा- 351
  • नांदेड-140
  • अकोला मनपा- 224
  • अमरावती- 166
  • अमरावती मनपा- 209
  • यवतमाळ-260
  • बुलडाणा-334
  • वाशिम - 132
  • नागपूर- 377
  • नागपूर मनपा-1976
Last Updated : Mar 14, 2021, 10:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details