मुंबई - आज (दि. 21 ऑक्टोबर) मुंबईत कोरोनाच्या नव्या 1 हजार 609 रुग्णांची नोंद झाली असून 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज (बुधवार) 894 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील अकरा दिवसात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 69 वरून 102 दिवस इतका वाढला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत 1 हजार 609 नव्या रुग्णांची वाढ, 48 रुग्णांचा मृत्यू - मुंबई कोरोना आकडेवारी बातमी
आज मुंबईत कोरोनाच्या नव्या 1 हजार 609 रुग्णांची नोंद झाली असून 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज (बुधवार) 894 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबईत बुधवारी कोरोनाचे 1 हजार 609 नवे रुग्ण आढळून आले असून 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 34 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 33 पुरुष तर 15 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 45 हजार 871 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 9 हजार 869 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 894 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 15 हजार 269 वर गेला आहे. सध्या मुंबईत 19 हजार 245 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 102 दिवस तर सरासरी दर 0.69 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 630 चाळी आणि झोपडपट्टी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 9 हजार 255 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 13 लाख 90 हजार 891 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -राज्यात ८ हजार १४२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, २१३ रुग्णांचा मृत्यू