महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात 11 हजारांहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात; तर 5, 027 नवीन रुग्णांचे निदान - maharashtra corona total deaths

राज्यात आजपर्यंत एकूण १५ लाक ६२ हजार ३४२ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.३५ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ४४ हजार ९६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के इतका आहे.

maharashtra corona update
महाराष्ट्र कोरोना अपडेट

By

Published : Nov 6, 2020, 9:55 PM IST

मुंबई -राज्यात आज (शुक्रवारी) ११, ०६० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ५, ०२७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच राज्यात १६१ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण १५ लाक ६२ हजार ३४२ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.३५ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ४४ हजार ९६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के इतका आहे.

हेही वाचा -राज्यात नाट्यगृह आणि चित्रपटगृहे उघडणार; मात्र कर्मचार्‍यांअभावी मालक चिंतेत

दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९३ लाख १८ हजार ५४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख १० हजार ३१४ (१८.३५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख ५९ हजार ४९९ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर ८ हजार ८७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण १ लाख २ हजार ९९ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details