महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई : 1071 जण कोरोनामुक्त तर नव्या 1180 रुग्णांची भर, कोरोनाग्रस्तांचा आकडा 82814 वर... - मुंबई कोरोना अपडेट

कोरोना विषाणूचे मुंबईत शनिवारी नवे 1 हजार 180 रुग्ण आढळून आले. तर 68 जणांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांसह मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 82 हजार 814 वर पोहचला आहे.

more 1180 new corona positive found in mumbai
मुंबई : 1071 जण कोरोनामुक्त तर नव्या 1180 रुग्णांची भर, कोरोनाग्रस्तांचा आकडा 82814 वर...

By

Published : Jul 5, 2020, 1:53 AM IST

मुंबई - कोरोना विषाणूचे मुंबईत शनिवारी नवे 1 हजार 180 रुग्ण आढळून आले. तर 68 जणांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांसह मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 82 हजार 814 वर पोहचला आहे. तर मृतांचा आकडा 4 हजार 827 इतका झाला आहे. मुंबईमधून शनिवारी 1 हजार 71 जण कोरोनामुक्त झाले. यासह कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा 53 हजार 463 झाला आहे. मुंबईत सध्या 24 हजार 524 सक्रिय रुग्ण असून मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 64 टक्क्यांवर पोहोचला आहे. ही माहिती पालिकेच्या आरोग्यविभागाने दिली.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत शनिवारी नव्याने 1 हजार 180 रुग्ण आढळून आले आहेत. तर 68 जणांचा मृत्यू झाला आहे. 68 मृत्यूपैकी 51 रुग्णांना दिर्घकालीन आजार होता. मृतांमध्ये 46 पुरुष आणि 22 महिला रुग्णांचा समावेश आहे. मृतांमधील तिघांचे वय हे 40 वर्षाखालील होते, 41 जणांचे वय हे 60 वर्षावर, तर 24 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. मुंबईमधून शनिवारी 1 हजार 71 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 53 हजार 463 वर पोहोचला आहे.

मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा एकूण 82 हजार 814 वर पोहोचला आहे. त्यापैकी 4 हजार 827 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईमधून आतापर्यंत 53 हजार 463 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे 24 हजार 524 सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्ण बरे होण्याचा दर 64 टक्क्यांवर -
मुंबईतील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 64 टक्क्यांवर पोहोचला आहे. 27 जून ते 3 जुलैपर्यंत रुग्ण वाढीचा दर 1.71 टक्के आहे. मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 41 दिवस इतका आहे.

मुंबईत सध्या ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, अशा 757 चाळी आणि झोपडपट्टी असलेले विभागात कंटेनमेंट झोन म्हणून सील करण्यात आले आहेत. तर कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 6 हजार 352 इमारतीमधील काही माळे, काही विंग तर काही इमारती पूर्ण सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 9 हजार 800 व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. सध्या कोरोना केअर सेंटरमध्ये 12 हजार 465 संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. आतापर्यंत 1 लाख 15 हजार 692 संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत कोरोनाचे निदान करण्यासाठी 3 लाख 49 हजार 913 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details