मुंबई -मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तब्बल दोन वर्षानंतर मुंबई ते पुणे आणि मुंबई ते नाशिक प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मासिक पास ( Monthly Pass ) मिळणार आहे. मध्य रेल्वेने पंचवटी ( Panchavati Express), इंटरसिटी ( Intercity Express ), इंद्रायणी ( Indrayani Express ), डेक्कन ( Deccan Express ), सिंहगड ( Sinhagad Express ) आणि डेक्कन क्वीन ( Deccan Queen Express ) या एक्स्प्रेसमध्ये मासिक पास ( Monthly Pass ) देण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवाशांना दिलासा -कोरोनामुळे देशभरातील राज्यातील महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले होते. आता कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्यावरही कोविड नियमानुसार, पॅसेंजर रेल्वे सुरू झाल्या, नियमित गाड्यांना विशेष एक्स्प्रेसने चालविण्यात येत होत्या. केवळ आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा होती. त्यामुळे या सर्व बाबींना प्रवासी वर्ग चांगलाच कंटाळला होता. मात्र, मध्य रेल्वेने आजपासून डेक्कन, इंटरसिटी, इंद्रायणी व सिंहगड या चार एक्स्प्रेसच्या जनरल तिकीटाची विक्री सुरू केली आहे. याशिवाय सीएसएमटी-मनमाड-सीएसएमटी पंचवटी, सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी इंटरसिटी, सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी इंद्रायणी, सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी डेक्कन, सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी सिंहगड आणि सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन या गाड्यांमध्ये मासिक पास देण्याचा निर्णय घेतला आहेत. या निर्णयामुळे मुंबई ते पुणे आणि मुंबई ते नाशिक नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहेत.