मुंबई - अजित पवार यांची बंडखोरी झाल्यानंतर सत्तेत आलेल्या अजित पवार गटाचे पहिले पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्रवादी व शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले आहे. अशात आजपासून सुरू होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरले आहे.
Live Updates:
- उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर अविश्वास ठराव असताना त्यांना खुर्चीवर बसण्याचा नैतिक व कायदेशीर नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे त्या पदावर बसू शकत नाहीत.नीलम गोऱ्हे यांना 14 दिवसांत नोटीसला उत्तर द्यावे लागणार आहे. हे सरकार बहुमताच्या जोरावर माजले आहे. उपसभापतींनी काम करू नये, अशी आमची भूमिका असल्याचे ठाकरे गटाचे अनिल परब यांनी माध्यमांशी सांगितले आहे.
- विधानसभेपाठोपाठ विधानपरिषदेतही विरोधक आक्रमक झाले. विरोधकांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर आक्षेप घेतला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सभापतींवर आक्षेप घेत नसल्याचे म्हटले आहे. विरोधकांनी विधानपरिषदेतून सभात्याग केला आहे. विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
- विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारविरोधात पहिल्याच दिवशी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले. विधिमंडळातदेखील विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
पेरणी न झाल्यास आपतकालीन प्लॅन-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की 50 हजार शेतकऱ्यांना मदत केली आहे. सरकार परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. पेरणी न झाल्यास आपतकालीन प्लॅन आहे. बियाणे जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत येणार आहे. बोगस बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्यावर अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, हा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
- शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. कामकाज थांबवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावंर चर्चा करावाी. सरकार खातेवाटप, दिल्ली व राजकारणात दंग आहे. त्यांचा स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी नाकारला आहे.
शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड व अजित पवार गटाचे मुख्य प्रतोद अनिल पाटील यांनी सर्व आमदारांना व्हीप बजाविला आहे. त्यामुळे कोणत्या गटाचा आज व्हीप चालणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अजित पवार, गटाचे मंत्री व आमदार यांनी यांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत चर्चा केली आहे.
- पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या विरोधक आक्रमक झाले असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले, म्हणाले, की विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला मोठी भूमिका पार पाडावी लागणार आहे. सरकारला जाब विचारण्याची काँग्रेसची भूमिका आहे. विरोधकांमध्ये काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष आहे. हायकमांडने निर्णय दिल्यानंतर विरोधकांचे नाव जाहीर करणार आहोत, पटोले यांनी सांगितले.
- विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस नेत्यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जोरदार घोषणाबाजी केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या आहेत. घटनाबाह्य कलंकित सरकारचा धिक्कार असो, असे बॅनर काँग्रेसच्या नेत्यांनी हाती घेतले आहेत. यावेळी ठाकरे गटाचे आमदारदेखील उपस्थित राहिले. विरोधकांची घोषणाबाजी करताना शरद पवार गटाचा एकही आमदार दिसून आला नाही.
- उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर ते विधानभवनात दाखल झाले आहेत. अजित पवार गटाकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे.
- शरद पवार गटाने सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांपासून वेगळी आसन व्यवस्था करावी, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. जयंत पाटील यांची आसन व्यवस्था सत्ताधारींच्या बाकाजवळ करण्यात आली आहे.