मुंबई:राज्यातील अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना महिला बचत गटांमार्फत देण्यात येणारे भोजन हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असते विद्यार्थ्यांना देण्यात येणारी खिचडी दगडाने फोडावी लागते कित्येकदा या खिचडी मध्ये आळ्या सुद्धा सापडतात त्यामुळे विद्यार्थ्यांना सकस आणि योग्य आहार सरकार देणार का असा प्रश्न आमदार सुनील राणे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारला.
राज्यातील अंगणवाडी तसेच इतर विद्यार्थांना देण्यात येणारे मध्यान्ह भोजन हे निकृष्ठ दर्जाचे असते अशा खुप तक्रारी आहेत. हे काम मधल्या काळात महिला बचत गटांना देण्याचा निर्णय झाला होता. मात्र तक्रारी कमी झालेल्या नाहीत. दर अधिवेशनात या संदर्भातील प्रश्न विचारण्यात येतो. आणि दरवेळी शासन यावर उत्तर देत शालेय विद्यार्थ्यांना मिळणार रुचकर मध्यान्ह भोजन देणार अशी घोषना करत असते. यावेळीही हा प्रश्न उपस्थित झाला. मात्र सरकारने आता योजनेत बदल करणार असल्याचे म्हणले आहे
विद्यार्थ्यांना रुचकर जेवण देण्या संदर्भात बोलताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तरात सांगितले की राज्यातील अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या माध्यन्ह भोजन योजनेत सरकार लवकरच बदल करणार आहे. यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कसा रुचकर आहार देण्यात येईल याविषयी आम्ही आढावा घेत आहोत.