मुंबई :राज्यामध्ये येत्या 3 ते 4 दिवस अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शासनाने त्या संदर्भात सावधानतेचा इशारा म्हणून सर्व शासकीय विभागांना आणि यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी या आदेश पत्रामध्ये किती कालावधीसाठी हा आदेश लागू राहील. याची निश्चित तारीख नमूद केलेली नाही. मात्र अतिवृष्टीचा अंदाज घेऊन आवश्यकतेनुसार ही सुट्टी जाहीर करावी,असे त्यांनी म्हटले आहे.
शाळांना सुट्टी :मुसळधार पावसामुळे राज्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते 12 वीच्या सर्व माध्यम सर्व मंडळाच्या शाळा अतिवृष्टीमुळे बंद राहतील. शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, इयत्ता पहिली पर्यंत ते 12वी पर्यंतच्या सर्व शाळा या अतिवृष्टीमुळे स्थानिक आवश्यकतेनुसार बंद राहतील. तसेच विविध मंडळाच्या शाळा तसेच सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये यात समावेश आहे. त्यामुळे त्या-त्या शाळांचे प्रमुख त्या-त्या विभागांचे प्रमुख यांनी नियोजन करावे. तसेच स्थानिक भागातील अधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने स्थानिक भागातील अतिवृष्टीचा तसेच शासनाने वर्तवलेला हवामान अंदाज लक्षात घेऊन नियोजन करावे. त्यांना शाळांना सुट्टी जाहीर करावी, असे या आदेश पत्रात नमूद केलेले आहे.