मुंबई- वृत्तवाहिन्यांच्या व मराठी वाहिन्यांच्या संदर्भात टीआरपी घोटाळा मुंबई पोलिसांनी ऑक्टोबर महिन्यात उघडकीस आणला होता. त्यानंतर या संदर्भात दाखल केलेल्या गुन्ह्याचा अभ्यास करून ईडीने देखील मनी लॉन्ड्रिंग संदर्भात गुन्हा दाखल केल्याचे समोर आले आहे. ऑक्टोबर महिन्यांत मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन वृत्तवाहिन्यांचा मोजमाप करणाऱ्या टीआरपी संदर्भात घोटाळा असल्याचा खुलासा केला होता.
ईडी बजावणार चौकशी साठी समन्स
टीआरपीचे मोजमाप करण्यासाठी देशभरात 30,000 बॅरोमीटर लावण्यात आले आहेत. मुंबई शहरात टीआरपी मोजण्यासाठी 3000 बॅरोमीटर लावण्यात आले असून याचे काम हंसा रिसर्च ग्रुपकडून केले जात होते. मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान हंसा रिसर्च ग्रुपच्या काही माजी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. ज्यामध्ये या कर्मचाऱ्यांकडून वृत्तवाहिन्यांचा टीआरपी वाढवण्यासाठी केबल कनेक्शन असलेल्या ग्राहकांना काही ठराविक वृत्तवाहिन्या पाहण्यासाठी चारशे रुपये दर महिन्याला दिले जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. त्यानंतर या संदर्भात पोलिसांनी एक विशेष पथकाची नेमणूक करून आतापर्यंत 12 आरोपींना अटक केली आहे.
टीआरपी घोटाळ्यासंदर्भात ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी गुन्हे दाखल - टीआरपी घोटाळ्याप्रकरणी इडीकडून गुन्हे दाखल
टीआरपीचे मोजमाप करण्यासाठी देशभरात 30,000 बॅरोमीटर लावण्यात आले आहेत. मुंबई शहरात टीआरपी मोजण्यासाठी 3000 बॅरोमीटर लावण्यात आले असून याचे काम हंसा रिसर्च ग्रुपकडून केले जात होते. मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान हंसा रिसर्च ग्रुपच्या काही माजी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या संदर्भात दाखल केलेल्या गुन्ह्याचा अभ्यास करून ईडीने देखील मनी लॉन्ड्रिंग संदर्भात गुन्हा दाखल केल्याचे समोर आले आहे.
मराठी वाहिन्यांचा समावेश
मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये रिपब्लिक वृत्तवाहिनीसह काही मराठी वाहिन्यांचा यामध्ये समावेश असल्याचे समोर आले होते. हंसा रिसर्च ग्रुपच्या काही कर्मचाऱ्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती व त्यांची चौकशी केली होती. यानंतर या अटक केलेल्या आरोपींपैकी काही जणांना लवकरच ईडीकडून चौकशीसाठी समन्स पाठवले जाणार आहेत.
कसा होतो टीआरपी घोटाळा
टीआरपीच्या घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत दरम्यान 12 आरोपींना अटक करण्यात आली असून तीन वाहिन्यांची नावे सुद्धा समोर आलेली आहेत. फक्त मराठी, बॉक्स मराठी आणि रिपब्लिक न्यूज चॅनेलचा यात समावेश असल्याचे समोर आले आहे. मुंबईत 3000 बरोमीटर्स लावून टीआरपी ऑपरेट केली जात असल्याचे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. मुंबईत काही परिसरात अशिक्षित लोकांच्या घरी इंग्लिश चॅनेल लावून ठेवण्याची अट या एजन्सीकडून लावण्यात येत होती. महिन्याला ठराविक पैसे सुद्धा या नागरिकांना दिले जात होते. मुंबई पोलिसांनी फक्त मराठी, बॉक्स मराठी या वाहिनीच्या मालकांना मुंबईतून अटक केली आहे.
32 हजार कोटींची आहे वार्षिक उलाढाल
भारतात वाहिन्यांच्या जाहिरातींची वार्षिक उलाढाल ही 32 हजार कोटी रुपयांची असून वृत्तवाहिन्या किंवा इतर करमणुकीच्या वाहिन्यांच्या टीआरपीवर त्यांच्या जाहिरातींचा दर ठरवला जातो. मुंबई पोलिसांच्या दाव्यानुसार रिपब्लिक न्यूज चॅनेलच्या विरोधात त्यांना ठोस पुरावे मिळाले असून रिपब्लिक चॅनेलच्या मॅनेजमेंटच्या व्यक्तींची चौकशी करण्यात येऊन घनश्याम सिंग यास अटक सुद्धा करण्यात आली होती. हंसा या एजन्सीच्या माध्यमातून त्याच्या काही माजी कर्मचाऱ्यांनी मुंबईत 200 घरांना टार्गेट करून त्यांना ठराविक रकमेवर इंग्रजी वृत्त वाहिन्या सुरू ठेवण्यासाठी अट घातली जात होती. यासाठी महिन्याला 400 ते 500 रुपये देऊन चॅनेल सुरू ठेवले जात होते. हे अशा प्रकारचे रॅकेट देशभरात सुरू असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी स्पष्ट केले की, यामागे असलेले सर्वजण गुन्हेगार असून याप्रकरणी वाहिनीच्या मालकापासून ते वर्गापर्यंत सर्वांना जबाबदार धरण्यात येऊ शकते.
हेही वाचा -टीआरपी वाढवण्यासाठी पैसे दिले जात असल्याची ग्राहकांची कबुली