महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजकीय सूडापोटीच्या कारवाईचा आरोप करणाऱ्यांना आजची ईडीची कारवाई ही चपराक - प्रवीण दरेकर

केंद्र सरकार आणि तपास एजन्सी, राजकीय सुडापोटी काम करत आहेत, असे आरोप करणाऱ्यांवर आजची अनिल देशमुख यांच्यावरील ईडीची कारवाई ही एक चपराक असल्याचे मत, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर व्यक्त केले आहे.

http://10.10.50.85:6060/reg-lowres/16-July-2021/mh-mum-pravindarekar-7209727_16072021171752_1607f_1626436072_531.mp4
राजकीय सूडापोटीच्या कारवाईचा आरोप करणाऱ्यांना आजची ईडीची कारवाई ही चपराक - प्रवीण दरेकर

By

Published : Jul 16, 2021, 11:49 PM IST

मुंबई -राजकीय सुडापोटी केंद्र सरकार आणि तपास एजन्सी काम करत आहेत, असे आरोप करणाऱ्यांवर आजची अनिल देशमुख यांच्यावरील ईडीची कारवाई ही एक चपराक असल्याचे मत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर व्यक्त केले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने कारवाई करत ४.२० कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली. ईडीच्या तपास प्रक्रियेत देशमुख यांची ही प्रॉपर्टी मिळालीय आणि ती सीझ झालीय, याचा अर्थ असा की, अशी प्रॉपर्टी होती. म्हणूनच त्यांच्याविरुद्धच्या तक्रारीत व तपासात तथ्य आहे. म्हणूनच ही कारवाई करण्यात आली असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले.

प्रवीण दरेकर प्रतिक्रिया देताना

कोणत्याही तपास यंत्रणेला मनमानी करता येत नाही, असे आपण नेहमीच सांगायचो. त्यामुळे भाजप, केंद्र सरकार व तपास यंत्रणेवर आरोप करणाऱ्यांचे आता तरी यामुळे समाधान होईल. कारण आता या प्रकरणात तथ्य आहे आणि भविष्यामध्ये यामधील एक एक गोष्टी आणि सत्य लोकांसमोर येईल, असेही प्रवीण दरेकर यावेळी म्हणाले.

अनिल देशमुख यांचे वरळीतील घर आणि उरणमधील जमीन जप्त
ईडीने अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या या स्थावर मालमत्तेची किंमत ४.२० कोटी रुपये इतकी आहे. यामध्ये वरळी येथील अनिल देशमुख यांच्या घराचा आणि उरण मधील जमिनीचा समावेश आहे.

काय आहे प्रकरण

सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाली होती. या बदलीनंतर सिंग यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालकांना एक पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये अनिल देशमुख यांच्यावर शंभर करोड रुपये वसुलीचे आरोप लावण्यात आले होते. या लेटर बॉम्बनंतर अनिल देशमुख यांचे गृहमंत्री पद देखील गेले होते. संपूर्ण प्रकरणाचा तपास ईडीने आपल्या ताब्यात घेतला असून आता कारवाई सुद्धा सुरू केली आहे.

हेही वाचा -नाना पटोले यांचे वक्तव्य गैरसमज निर्माण करणारे -दिलीप वळसे पाटील

हेही वाचा -भाजपला घाबरणाऱ्यांना पक्षाबाहेर हाकला, आपल्याला निडर लोक हवेत - राहुल गांधी

ABOUT THE AUTHOR

...view details