महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MVA Mahamorcha : महामोर्चात गर्दी जमवण्यासाठी पैशांचे वाटप?, भाजप नेत्याने शेअर केला व्हिडिओ - महाविकास आघाडी

भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी एक ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत गळ्यात कॉंग्रेसचा गमछा घातलेले काही तरुण कार्यकर्ते पैसे घेताना दिसत आहेत. केशव उपाध्ये यांच्या दाव्यानुसार कॉंग्रेसने महामोर्चात गर्दी जमवण्यासाठी भाड्याने कार्यकर्ते आणले आहेत. (money distributed to gather crowd in Mahamorcha). ईटीव्ही भारत मात्र या व्हिडिओची पुष्टी करत नाही. (Mahamorcha of Maha Viksa Aghadi)

MVA Mahamorcha
MVA Mahamorcha

By

Published : Dec 17, 2022, 10:19 PM IST

मुंबई :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि इतर नेत्यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज मुंबईत महामोर्चाचं आयोजन केलं होतं. (Mahamorcha of Maha Viksa Aghadi) या मोर्चात महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र आता या मोर्चातील गर्दीवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

केशव उपाध्ये यांचे ट्वीट :भाजप नेते केशव उपाध्ये यांनी एक ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत गळ्यात कॉंग्रेसचा गमछा घातलेले काही तरुण कार्यकर्ते पैसे घेताना दिसत आहेत. केशव उपाध्ये यांच्या दाव्यानुसार कॉंग्रेसने मोर्चात गर्दी जमवण्यासाठी भाड्याने कार्यकर्ते आणले आहेत. मुंबईतील पत्रकार संघाच्या जवळ असलेल्या काॅंग्रेस कार्यालयाजवळचा हा व्हिडिओ असल्याचे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. ईटीव्ही भारत मात्र या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

मविआच्या महामोर्चावर नेत्यांच्या प्रतिक्रिया : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Former CM Uddhav Thackeray ) यांनी महामोर्चात वादग्रस्त वक्तव्या करणाऱ्यांविरोधात जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, आज निघालेला हा महामोर्चा महाराष्ट्र द्रोह्यांचा शेवट करणारा मोर्चा आहे. महाराष्ट्र द्रोह्यांना गाडण्यासाठी आज आम्ही एकत्र जमलो आहोत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Sharad Pawar ) म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. त्यामुळेच आज लाखोंच्या संख्येने मोर्चा एकत्र आला आहे. महापुरूषांबाबत राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यामुळे त्यांची हकालपट्टी लवकरात लवकर करा, अन्यथा हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवय रहाणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे. महाराष्ट्रात सध्या सीमावादावरून राज्यातील अनेक गावे परराज्यात जाण्यासाठी मागणी करत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपकडून महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी प्रयत्न केल्या जात असल्याचा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी महामोर्चात केला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या महामोर्चावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ( DCM Devendra Fadnavis on Mahamorcha ) बोलताना त्यांनी या मोर्चाला नॅनो मोर्चा असे संबोधले आहे. त्याचबरोबर जे स्वतः वारंवार देवी - देवता, संत, महापुरुषांचा अपमान करत आहेत त्यांना मोर्चा काढण्याचा अधिकारच नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

मोर्चाची सुरूवात ते समारोप : भायखळा येथील जेजे रुग्णालयाजवळील कंपनीपासून सुरू झालेल्या ह्या मोर्च्याचा समारोप दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भाषणाने झाला. भायखळ्यातील जेजे रुग्णालयाजवळील कंपनीपासून ते सीएसएमटी पर्यंत सुमारे तीन किलोमीटर हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आला होता. जागोजागी पोलिसांची पथक तैनात करण्यात आली होती. महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल करत वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते.

मोर्चाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद : मोर्चाला सुरुवात झाली तेव्हा सगळ्यांच्या हातात बॅनर, फलक, शिवाजी महाराज आणि फुले यांचे पुतळे दिसत होते. तत्पूर्वी, राज्यभरातून शिवसेना राष्ट्रवादी-कॉंग्रेस व कॉंग्रेस या तीनही पक्षाचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी मविआने हा मोर्चा काढला होता. त्यामुळे या मोर्चामध्ये महापुरुषांचे पुतळे ठेवण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचे पुतळे मोर्चात पाहायला मिळाले.

ABOUT THE AUTHOR

...view details