महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेल्वेत महिलांचे विनयभंग करणाऱ्या नराधमास अटक - molestation

अशरफ अली करीमुल्ला शेख (वय २७) असे या नराधमाचे नाव आहे. अटक करण्यात आलेला नराधम हा रेकॉर्डवरचा सराईत गुन्हेगार आहे.

गुन्हेगार

By

Published : Feb 19, 2019, 3:47 PM IST

मुंबई - रेल्वे प्रवासादरम्यान संधीचा फायदा घेऊन महिलांचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला सिएसएमटी लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेला नराधम विकृत असून यापूर्वीही त्याच्यावर अशा प्रकारचे गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहेत. तक्रारदार महिला परेलच्या एका शाळेत शिक्षिका आहे.

Criminals

आठवड्याभरपूर्वी सॅन्डहर्ट्स रोड ते मस्जिद बंदर मार्गावरील लोकलमध्ये हा प्रकार घडला होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने या विकृताला बेड्या ठोकल्या आहेत. अशरफ अली करीमुल्ला शेख (वय २७) असे या नराधमाचे नाव आहे. अटक करण्यात आलेला नराधम रेकॉर्डवरचा सराईत गुन्हेगार आहे. याआधी २०१७ साली त्याने एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यात त्याला एक वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ऑक्टोबर २०१८ मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर आरोपीने पुन्हा हा गुन्हा केलेला आहे.

आरोपी शेख याच्यावर दादर आणि सीएसटी रेल्वे पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे नोंद आहेत. या गुन्ह्यात तो जामिनावर सुटला होता. २०१७ साली विनयभांगच्या गुन्ह्यात शिक्षा सुनावल्यानंतर त्याच्या पत्नीने त्याला सोडून दिले. त्याला दोन मुलेसुद्धा आहे. आरोपी हा विकृत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. चर्चगेट स्टेशनवर रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली.

ABOUT THE AUTHOR

...view details