महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रेयसीच्या वडिलांवर हल्ला करणाऱ्या आरोपीला तब्बल 22 वर्षानंतर अटक - पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Mumbai Crime : प्रेयसीचं लग्न दुसऱ्याशी ठरवल्याच्या कारणावरुन आरोपीनं मुलीच्या आई-वडिलांवर जिवघेणा हल्ला केला होता. ही घटना 12 ऑगस्ट 2001 रोजी मुंबईतील कंदिवली पूर्वमध्ये घडली होती. तेव्हापासून आरोपी मोईउद्दीन शेख फरार होता. त्याल तब्बल 22 वर्षानंतर पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे.

Moiuddin Sheikh arrested
Moiuddin Sheikh arrested

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2023, 9:04 PM IST

मुंबईMumbai Crime :22 वर्षा पूर्वी कंदिवली उपनगरात कुरार मुंबईमध्ये आरोपीचे एका मुलीशी प्रेम संबंध होते. मात्र, मुलीच्या वडिलांनी तिचं लग्न दुसऱ्याशी ठरवलं होतं. त्यामुळं आरोपी प्रियकरानं मुलीच्या वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. तेव्हापासून आरोपीचा शोध पोलीस घेत होते. तब्बल 22 वर्षानंतर कुरार पोलीस ठाणे मुंबई यांना आरोपींना जेरबंद करण्यात यश आलं आहे.





मुलीच्या वडिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न : मोईउद्दीन शेख असं या आरोपीचं नाव आहे. त्यांचं हिमा कादरी (नाव बदलेलं आहे) हिच्यावर प्रेम होतं. मात्र, तिच्या वडिलांनी तिचं लग्न दुसऱ्याच मुलाशी ठरवलं होतं. त्यामुळं प्रियकर मोईद्दीन शेखला संताप आला होता. त्यामुळं त्यानं 12 ऑगस्ट 2001 रोजी मुंबईतील कंदिवली पूर्वमध्ये मुलीचे आई-वडील झोपेत असताना त्यांच्या गुडलक हॉटेलवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोपीवर आरोप आहे. या घटनेनंतर आरोपी फरार होता. तब्बल 22 वर्षानंतर मुंबई पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्याच्यावर आयपीसी कलम 307, 436, 438, 440 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.


असा काढला आरोपीचा माग : मात्र, सतत 22 वर्षे आरोपीकडून हुलकावणी दिली जात होती. त्यामुळं कुरार पोलिसांनी तसंच मुंबई गुन्हे शाखा यांनी संयुक्त आरोपींच्या हालचालीवर लक्ष केंद्रित केलं. गेल्या तीन-चार महिन्यापासून पोलिसांनी सातत्यपूर्ण एकमेकांच्या माहिती देवाणघेवाण करत आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला.


आरोपी वेषांतर करून पुण्यात राहत होता : मुख्य आरोपी आपली ओळख लपवून पुण्यात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच वेळी, त्यानं पुन्हा लग्न देखील केलं होतं, परंतु नातेवाईकांना आमंत्रित केलं नव्हतं. आपल्या लग्नाची माहितीही त्यानं लपवून ठेवली होती. परंतु पोलिसांनी गुप्त पाळत ठेवून 24 नोव्हेंबरला आरोपीला अटक केली. त्यामुळं तब्बल 22 वर्षांनंतर या आरोपीला अटक करण्यात यश आले. पोलीस सहआयुक्त लखमी गौतम, सहायक पोलिस आयुक्त राज टिळक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा -

  1. क्रूरतेचा कळस! तरुणाला बेदम मारहाण, लघुशंका केलेल्या मातीचा तोबरा भरून भुवया उपटल्या
  2. पत्रकार सौम्या विश्वनाथन खून खटल्यातील ४ दोषींना जन्मठेपेची शिक्षा
  3. नांदेडमधून 12 तलवारी आणि 11 खंजर जप्त; एका आरोपीला गुन्हे शाखेनं ठोकल्या बेड्या

ABOUT THE AUTHOR

...view details