मुंबई -मुंबईत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे किंवा इतर आजारांनी मरण पावलेल्या व्यक्तीचे कुटंब पुढे येत नसल्यामुळे अंत्यसंस्कार थांबले आहे. या प्रक्रियेत पुढाकार घेण्याची तयारी मुंबई भाजपचे सरचिटणीस मोहित भारतीय यांनी दर्शवली आहे. त्यासाठी मुंबईचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांना पत्र देऊन औपचारिक परवानगी देण्याची विनंती केली आहे.
कोरोनाग्रस्त मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी मोहित भारतीय यांचा पुढाकार - mumbai corona positive cases
कोरोना संक्रमणामुळे बळी पडलेल्या शेकडो व्यक्तींचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घरी घेऊन जाण्यासाठी त्यांचे कुटुंबीय पुढे येत नसल्याची बाब समोर आली आहे. यामुळे अनेक दिवसांपासून मुंबईतील शवागारात मृतदेहांचे ढीग पडून आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी भाजपच्या मोहित भारतीय यांनी पुढाकार घेतला आहे.
‘कोरोना संक्रमणामुळे बळी पडलेल्या शेकडो व्यक्तींचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घरी घेऊन जाण्यासाठी त्यांचे कुटुंबीय पुढे येत नसल्याची बाब समोर आली आहे. यामुळे अनेक दिवसांपासून मुंबईतील शवागारात मृतदेहांचे ढीग पडून आहेत’, असे भारतीय यांनी महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. अशा मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्याच्या कामी लागणाऱ्या वस्तू देत मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्याची तयारी संस्थेने दर्शवली आहे.
मुंबई महापालिकेकडून परवानगी मिळाल्यास फाउंडेशनच्यावतीने मृतदेह शवागारातून उचलण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था होईल. रुग्णालयाच्या शवागारातून स्मशानभूमीत नेण्यात येईल आणि तेथे प्रत्येक पार्थिवावर पूर्ण सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येईल, असे पत्रात नमूद केले आहे.