मुंबई -मोहम्मद हनीफ शेख याला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. 2 महिन्यांच्या अर्भकाच्या अपहरणातील आरोपी तो आरोपी आहे. अर्भकाला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी आणि मुलीला परत मिळवण्यासाठी 8 टीम तयार केल्या होत्या.
दोन महिन्याचे बाळ पळवून नेणाऱ्याच्या काही तासातच पोलिसांनी आवळल्या मुसक्या एफआयआर दाखल: सेंट झेवियर्स शाळेजवळच्या रस्त्यावरून 2 महिन्यांच्या बाळाचे अपहरण करण्यात आले होते. तिच्या आईसोबत ही बाळ झोपली होती. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली होती. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी ताबडतोब हालचाली सुरू केल्या. त्यामुळे लगेच आरोपी हाताशी लागला. त्याचा सीसीटीव्ही फुटेजमध्ये माग लागला. त्यावरुन त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी वेगवेगळ्या 8 टीम तयार केले:अवघ्या १0 तासांत अपहरण करणाऱ्या या जोडप्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. CCTV व्हिज्युअल फुटेजनुसार पोलिसांनी वेगवेगळ्या 8 टीम तयार करत शोधमोहिम सुरू केली होती. यानंतर अपहरण्याच्या गुन्ह्यांतर्गत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या आरोपीचे नाव मोहम्मद हनीफ शेख असे आहे. यानंतर अपहरण झालेल्या 2 महिन्याच्या अर्भकाला त्याच्या कुटूंबियांच्या ताब्यात दिले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
मुंबई पोलीसांची माहिती:पोलीस पथकाने योग्य ती खातरजमा करून संशयित आरोपीस ताब्यात घेत चौकशी केली आहे. यानंतर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी आणि त्याच्या पत्नीने स्पष्ट केले की, दोघांनी आपापसात संगनमत करून विक्री करण्याच्या उद्देशानेच या बालिकेचे अपहरण केले होते. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या उपस्थितीमध्ये संबंधित अर्भक महिलेच्या अहवाले सुपुत करण्यात आले आहे. त्यावेळी मुंबई पोलिसांनी केलेल्या कामगिरीवर महिला आणि महिलेच्या पतीने समाधान व्यक्त करत आभार मानले आहे. तसेच मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपीचे मुस्कळ दाबण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. या कामगिरीमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.