मुंबई- मुंबई ठाणे पनवेल, नाव्हाशेवा, उरण सारख्या परिसरात 30 घरफोड्या करणाऱ्या राहुल थापा या नेपाळी नागरिकाला नवी मुंबईतील ऐरोली परिसरातून अटक केली आहे. आरोपीने 2007 ते 2008 या काळात पवई परिसरात तब्बल वीस घरफोड्या केल्याचे समोर आले आहे. आरोपीला याआधी 2011 ला अटक झाली होती. त्यावेळी त्याची जामिनावर सुटका झाली होती. या आरोपीने पुन्हा मुंबईच्या बाहेर घरफोड्या करण्यास सुरुवात केली. मॉडेलिंगची हौस असणारा आरोपी राहुल थापा हा घरफोडीतून मिळालेला पैसा स्वतःचे पोर्टफोलिओ फोटोग्राफी करण्यास खर्च करीत होता.
जामिनावर सुटून ३० घरफोडी करणारा 'मॉडेल' पोलिसांच्या जाळ्यात - mumbai crime news
घरफोडी करण्यात सराईत असलेला आरोपी, उंची कपडे घालून मोटारीतून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, उल्हासनगर सारख्या शहरात सीसीटीव्ही नसलेल्या व वयोवृद्ध वॉचमन असलेल्या इमारतींची रेकी करायचा.
हेही वाचा-बीएसएनएलला पॅकेज देण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन
घरफोडी करण्यात सराईत असलेल्या हा आरोपी उंची कपडे घालून मोटारकार घेऊन मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, उल्हासनगर सारख्या शहरात सीसीटीव्ही नसलेल्या व वयोवृद्ध वॉचमन असलेल्या इमारतींची रेकी करायचा. घरफोडी करण्यासाठी तो नेहमी दुपारी 12 ते 4 हीच वेळ निवडायचा. राहुल थापा मुंबईतील ऐरोली परिसरात अशाच प्रकारची रेकी करण्यास येणार असल्याची माहीती, पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे युनिट 3 ने सापळा रचून आरोपीला अटक केली आहे.