मुंबई:तक्रारदार फिजा नाझिम खान या देखील वांद्रे येथील गरीब नगर परिसरात राहत असून तिने पोलिसांनी सांगितले की, तिचे पती नाजिम इफ्तेकार खान यांचीआरोपी शादाब चांद मोहम्मद खान उर्फ भुरा (वय 21 वर्षे) यांची मागील सहा ते सात महिन्यापासून ओळख होती. मागील एक महिन्यापूर्वी आरोपी शादाब याचा धक्का लागून नाझीमचा मोबाईल खाली पडला. त्यासाठी रिपेअरिंगचा खर्च एक हजार रुपये इतका आला होता. या खर्चाचे १००पैकी आज आरोपीने ५०० रुपये हे नाझिम याच्या पत्नीस दिले.
चाकू छातीत भोकसला: उरलेले ५०० रुपये रात्री बारापर्यंत देतो असे सांगितले. मात्र, नाजीमने आजच ५०० रुपये पाहिजे असा तगादा लावला. त्यावरून नाझीम आणि शादाब या दोघांमध्ये वाद झाला. वांद्रे रेल्वे स्टेशनचा ब्रिजच्या खाली त्यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. त्यावेळी शादाबचा मोठा भाऊ शानू हा देखील नाझीम याला हाताने मारहाण करत होता. त्यानंतर ते तिथून प्लॅटफॉर्म नंबर 7 वरून शिडी चढून जात असतानाच आरोपी शादाबने नाझीम याला खाली खेचले आणि त्याच्या हातातील चाकूने नाझिम याच्या छातीत भोसकले आणि तो चाकू त्याचा भाऊ शानु याच्याकडे दिला. या मारहाणीत नाझीम गंभीर जखमी झाला. नंतर उपचारासाठी भाभा रुग्णालयात नेले असता त्यास दाखल पूर्व मयत घोषित केले.