महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुम्ही नको त्या फंद्यात पडू नका, मनसेचा दमानियांना इशारा - राज ठाकरे

राज ठाकरेंच्या चौकशीबाबत अंजली दमानिया यांनी टीका केली होती. या त्यांच्या टिकेला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

मनसे कार्यकर्त्याचा दमानियांना इशारा

By

Published : Aug 22, 2019, 8:05 PM IST

मुंबई - राज ठाकरेंच्या चौकशीबाबत अंजली दमानिया यांनी टीका केली होती. या त्यांच्या टीकेला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. दमानिया तुम्ही नको त्या फंद्यात पडू नका. राज ठाकरे हे सत्यनारायणाच्या पूजेला गेलेत की तुमच्या मालकांच्या अंत्ययात्रेला ते लवकरच तुम्हाला कळेल, असा गर्भित इशारा मनसेचे कार्यकर्ते अखिल चित्रे यांनी दिला आहे.

अंजली दमानिया तुम्ही मनसे कार्यकर्त्यांच्या कोणत्याही फंद्यात पडू नका. उगीच काही बरळत बसू नका. एखाद्या परिवाराची मुख्य व्यक्ती जर संकटात असेल तर पूर्ण परिवार त्याचे मनोबल वाढवण्यासाठी त्याच्यासोबत जातो. तसेच राज ठाकरेंसोबत त्यांचे कुटुंब ईडी कार्यालयात गेले. ते सत्यनारायणाच्या पुजेला गेलेत की तुमच्या मालकांच्या अंत्ययात्रेला ते लवकरच तुम्हाला कळेल, असा इशाराही मनसे कार्यकर्ते चित्रे यांनी दिला आहे.

मनसेचा दमानियांना इशारा

नको त्या फंद्यात पडू नका

सरकारच्या बाजूने तुम्ही आरटीआयच्या माध्यमातून जे करत आहात, ते धंदे आता करू नका. तुम्ही नको त्या फंदात पडू नका, असा इशाराही मनसे कार्यकर्त्यांनी अंजली दमानिया यांना दिला आहे.

काय म्हणाल्या होत्या दमानिया

राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा ड्रामा? का सहनुभी गोळा करण्याचा हा प्रयत्न. असे ट्वीट दमानिया यांनी केले होते. त्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

ABOUT THE AUTHOR

...view details