महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वरळी मतदार संघातील शूटिंग प्रकरणावरून मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा - मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

गेल्या शुक्रवारी वरळी कोळीवाड्यामध्ये संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून ते रात्री साडेबारा वाजेपर्यंत एका चित्रपटाचे शुटिंग सुरू होते. हे शूटिंग दिशा पटानी आणि जॉन अब्राहम यांच्या सिनेमाचे होते. रात्रीपर्यंत या सिनेमाचे शुटिंग सुरू होते. या सिनेमाच्या शुटिंगसाठी कुणाची परवानगी होती?, याला महानगरपालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली, असा सवाल मनसे नेते संतोष धुरी यांनी उपस्थित केला आहे.

Worli Constituency Film Shooting News
मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

By

Published : Mar 11, 2021, 6:30 PM IST

मुंबई -कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असताना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात मात्र नियमाची पायमल्ली करणाऱ्या एका पबचा व्हिडिओ मनसे नेते संतोष धुरी यांनी समोर आणला होता. यानंतर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत चौकशी आणि कारवाईचे आदेश दिले होते. आता आणखी एक व्हिडिओ समोर आणत वरळीमध्ये मध्यरात्रीपर्यंत अभिनेत्री दिशा पटानी आणि जॉन अब्राहमच्या चित्रपटाच्या शुटींगला परवानगी देण्यात आल्याचा आरोप धुरी यांनी केला आहे.

मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
मागील वर्षी वरळी हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते. आता पुन्हा याठिकाणी काळजी घेतली पाहिजे, असे असताना वरळी मतदारसंघामध्ये भरवस्तीमध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत चित्रपटाच्या शुटींगला परवानगी देण्यात कशी देण्यात येते, असा प्रश्न धुरी यांनी उपस्थित केला आहे. धुरी यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करत थेट आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यामध्ये ‘युवराजांची दिशा चुकली’ असा उल्लेख करून त्यांनी आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधाला.हेही वाचा -प्लॉटच्या मालकी वादावरून दोन माजी नगराध्यक्षांच्या गटात तुंबळ हाणामारी; १८ जणांवर गुन्हे दाखल


दिशा पटानी आणि जॉन अब्राहम यांच्या चित्रपटाचे शूटिंग

गेल्या शुक्रवारी वरळी कोळीवाड्यामध्ये संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून ते रात्री साडेबारा वाजेपर्यंत एका चित्रपटाचे शुटिंग सुरू होते. हे शूटिंग दिशा पटानी आणि जॉन अब्राहम यांच्या सिनेमाचे होते. रात्रीपर्यंत या सिनेमाचे शुटिंग सुरू होते. या सिनेमाच्या शुटिंगसाठी कुणाची परवानगी होती?, याला महानगरपालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली, असा सवाल संतोष धुरी यांनी उपस्थित केला आहे.

या ठिकाणी मोठी गर्दी जमा करण्यात आली होती. वरळी विधानसभा क्षेत्रात कोरोनाच्या निर्बंधांमुळे प्रवेश करण्यास बंदी आहे. तरीही असे प्रकार होताना दिसत आहेत. याबाबतचा प्रश्‍न काही दिवसांपूर्वी मी उपस्थित केला होता. मात्र, हाच प्रश्न आता पुन्हा उपस्थित करावा लागतो आहे, असा टोलाही धुरी यांनी लगावला आहे.

हेही वाचा -थकीत वीजबिले भरा; वीज जोडण्या खंडित करण्याच्या मोहिमेवरील स्थगिती उठवली

ABOUT THE AUTHOR

...view details