मुंबई - भारतातील वाहन उत्पादन क्षेत्रातील मागणी सर्व बाहेरील देशातील कंपनी भारतात येण्यासाठी उत्सुक आहेत. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी टेस्लाची भारतात एंट्री झाली आहे. एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने ‘टेस्ला मोटर्स इंडिया अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने उत्पादन करण्यासाठी कर्नाटक राज्याची निवड केली आहे. आता यावरून राजकरण तापू लागले आहे. या कंपनीने महाराष्ट्राची निवड न केल्याने मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव घेता त्यांच्यावर टीका केली आहे.
रिट्वीट करुन टीका
मंत्री आदित्य ठाकरे यांनी टेस्ला कंपनीला महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण दिले होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली होती. तसेच केवळ गुंतवणूकीसाठी नाही तर भविष्यातील इलेक्ट्रिक मोबिलिटीचा विचार करुन हे निमंत्रण दिल्याचे ट्विटरद्वारे आदित्य यांनी सांगितले होते. आदित्याच्या त्याच ट्विटला रिप्लाय देताना देशपांडे यांनी, “टेस्ला कंपनी कर्नाटकला पळाली, बोलाची कढी बोलाचा भात, पेज-३ नेत्यांना झटका” असे ट्विट करत आदित्य यांच्यावर निशाणा साधला आहे.