मुंबई - लॉकडाऊनमुळे वाहतूक सेवा ठप्प आहे. तसेच रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी सहज रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णांच्या सेवेसाठी रिक्षा टॅक्सी रुग्णवाहिका सुरू करावी, असा प्रस्ताव महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने महापालिकेसमोर मांडला आहे. यासाठी मुंबईत सुरुवातील सुमारे 450 टॅक्सी रुग्णवाहिका सेवेसाठी देण्याची तयारी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने दर्शवली आहे.
मुंबईत रुग्णांसाठी मनसे रिक्षा, टॅक्सी, रुग्णवाहिका चालवणार; महापालिकेसमोर प्रस्ताव - मुंबई लेटेस्ट न्युज
मनसेने प्रभाग स्तरावर मोफत रिक्षा टॅक्सी रुग्णसेवा देण्याची तयारी दाखवली आहे. संबंधित प्रस्ताव महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी महापालिकेला दिला.
मुंबईत कोरोनाबाधित रुग्ण तसेच मृत्यूचे प्रमाण वाढले असून त्या तुलनेत रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णांची फरफट होत आहे. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाची परवानगी मिळाल्यानंतर या प्रस्तावावर प्रत्यक्ष कारवाई होणार आहे. मनसेने प्रभाग स्तरावर मोफत रिक्षा टॅक्सी रुग्णसेवा देण्याची तयारी दाखवली आहे. संबंधित प्रस्ताव महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी महापालिकेला दिला.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अभियंता अशोक यमगर तसेच सुनील सरदार आदींनी टॅक्सी रुग्णवाहिकेची पाहणी केली.
चालकाच्या मागील बाजूस प्लास्टिक पडदा स्वरुपात शिट लावली जाईल. यासाठी येणारा खर्च तसेच त्यावर होणारा सीएनजी खर्च याशिवाय दैनंदिन सॅनिटायझेन आदींचा प्रश्न आहे. प्रत्येक नगरसेवक दोन याप्रमाणे नगरसेवक संख्येनुसार टॅक्सी रुग्णवाहिका विभाग कार्यालयात उभ्या केल्या जातील आणि नागरिकांच्या मागणीनुसार ही सेवा जनतेला मोफत दिली जाईल,असे संजय नाईक यांनी सांगितले.