मुंबई - वाढीव वीज बिलांविरोधात मनसेने राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. वाढीव वीज बिलांनी त्रस्त झालेल्या जनतेला न्याय देण्यासाठी महाराष्ट्रात मनसेतर्फे वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वीज दरवाढीसंदर्भाबाबत यापूर्वी मनसेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन वीज दरवाढ कमी करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. त्यानंतर अजूनही याबाबत काहीही निर्णय घेण्यात आला नाही. सरकार या प्रश्नावर गंभीर दिसत नाही. या कारणास्तव वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेतर्फे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. सरकारला हा अंतिम इशारा देण्यात आला आहे, असे मनसेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मनसेचे वाढीव वीज बिलांविरोधात राज्यव्यापी आंदोलन
वाढीव वीज बिलांविरोधात मनसेने राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. वाढीव वीज बिलांनी त्रस्त झालेल्या जनतेला न्याय देण्यासाठी महाराष्ट्रात मनसेतर्फे वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सरकारला हा अंतिम इशारा देण्यात आला आहे, असे मनसेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मुंबई मनसे राज्यव्यापी आंदोल
पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र मोर्चा काढणार यावर मनसे नेते ठाम होते. वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. हा मोर्चा शांतपणे पार पडला. मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व निवेदन दिले. वीज बिलाबद्दल तात्काळ दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. दिलासा मिळाला नाही तर पुढेही आमची मोर्चाची तयारी आहे. मनसेला नोटीस पाठवा किंवा कार्यकर्त्यांची धरपकड करा आम्ही घाबरत नाही, असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले.