महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'एनपीआर' सांगेल, मराठी मुला-मुलींचा रोजगार हिरावतंय कोण? - मनसे प्रवक्ते अनिल शिदोरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एनपीआरमुळे व्यक्तीच्या आई-वडिलांचे जन्मस्थान समजणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत मनसे प्रवक्ते अनिल शिदोरेंनी ट्विट केले आहे.

मनसे
मनसे

By

Published : Dec 25, 2019, 4:59 PM IST

मुंबई - सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधातील लोकांचा रोष कायम असताना मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय लोकसंख्या सूची अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला. काही राज्यांनी 'सीएए' आणि 'एनआरसी' सोबत यालाही विरोध केला आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एनपीआरमुळे व्यक्तीच्या आई-वडिलांचे जन्मस्थान समजणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत मनसे प्रवक्ते अनिल शिदोरेंनी ट्विट केले आहे.

हेही वाचा -मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी तरुणाला मारहाण करणाऱ्या ५ शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल

'राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी पुस्तक (एनपीआर) मध्ये एक महत्त्वाची गोष्ट नोंदवली जाणार आहे. ती म्हणजे "आई-वडिलांचे जन्मस्थान". ह्यामुळे महाराष्ट्रात येऊन इथल्या मराठी मुला-मुलींचा हक्काचा रोजगार कोण हिरावून घेत आहे, हे समजेल. फक्त ती माहिती सर्वांना उपलब्ध हवी, असे ट्विट शिदोरे यांनी केले आहे.

मनसेकडून स्थापनेपासूनच मराठी आणि भूमिपुत्रांच्या रोजगाराबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील मराठी मुला-मुलींचा हक्काचा रोजगार परराज्यातून आलेले लोक हिरावत असल्याचा मुद्दा घेऊन मनसे नेहमीच रस्त्यावर उतरल्याचे दिसून येते. एनपीआरवर प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी माहिती दिली असली तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details