मुंबई :ठाणे-पालघर मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर दहीहंडी उत्सवासाठी बांधण्यात आलेला व्यासपीठ काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईनंतर मनसे आक्रमक झाली आहे. 'दहीहंडी साजरी करण्यावरच मनसे ठाम आहे. आज एकट्या अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले आहे. पण उद्या हजारो मनसे कार्यकर्ते ठाण्यात जमतील. त्याचं काय करणार? आम्हाला पण बघायचे की मनसे कार्यकर्त्यांना कशाप्रकारे ताब्यात घेतात?', असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
मनसे भूमिकेवर ठाम
यावर्षी देखील दहीहंडी वरती निर्बंध लावण्यात आलेले आहे. दहीहंडी साजरा करू नका, असे आवाहन करण्यात आलेले आहे. मात्र मनसेने आम्ही दहीहंडी साजरी करणार अशी भूमिका घेतली आहे. ठाण्यामध्ये मनसे नेते अविनाश जाधव यांनी जोरदार तयारी केली. मात्र, काल त्यांना नोटीस देण्यात आली. यानंतरही जाधव यांनी काम सुरू ठेवले. दरम्यान, आज त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र कारवाई केली तरी आम्ही दहीहंडी साजरी करणार यावरती मनसे नेते ठाम आहेत.
'दहीहंडी तर साजरी होणारच, आदेश राजसाहेबांचा...'