मुंबई -कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आरोग्य यंत्रणा यांना देखील कोलमडलेली चित्र काही ठिकाणी आहे. त्यातच मुंबईतील सर्वात मोठे असलेल्या बीकेसी जम्बो कोविड सेंटरवरती मनसे नेते अखिल चित्रे यांनी गंभीर आरोप केले होते. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील लिहिले होते. मात्र अनेक दिवस उलटून सुद्धा कारवाई आणि उत्तर देखील न आल्यामुळे चित्रे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा स्मरणपत्र दिले आहे.
बिकेसी कोविड सेंटरमध्ये 90% डॉक्टर BDS, BAMS, BUMS, BHM आहेत. तर हे डॉक्टर गंभीर स्वरूपाच्या रुग्णावर उपचार कसा करणार? असा प्रश्न मनसे नेते अखिल यांनी उपस्थित केला होता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित गरज लागल्यास आम्ही स्वतः नामवंत डॉक्टरांची फौज उभी करू, मात्र आम्हाला प्रशासन सहकार्य करत नाही, असा आरोप केला होता. अनेक दिवस उलटून गेले असतानाही पत्राला कोणतेही उत्तर न आल्याने त्याबरोबर ज्या ॲडमिन विभागातील काही कर्मचाऱ्यांनी काही माहिती उपलब्ध करून दिली त्यांच्यावरच कारवाई होत असल्याचे दिसत आहे. यामुळे आतातरी या बीकेसी कोविड सेंटर वरती कारवाई करावी, यासाठी पुन्हा चित्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.