महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MNS Poster: मनसेने रामनवमीनिमित्त लावले 'गर्व से कहो हम हिंदू है!' अशा आशयाचे बॅनर; ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न

मनसेकडून नेहमीच वेगवेगळ्या कारणांवरून बॅनरबाजी केली जाते. आता श्रीराम नवमी उत्सवानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 'गर्व से कहो हम हिंदू है' अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. माहीम परिसरात मनसेकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरद्वारे एक प्रकारे ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

MNS Poster
मनसेचे बॅनर

By

Published : Mar 30, 2023, 7:36 AM IST

प्रतिक्रिया देताना संकेत धनु, शाखा अध्यक्ष, माहीम विधानसभा

मुंबई : मनसेकडून हिंदू उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा नुकताच शिवाजी पार्क येथे मोठा उत्साहात पार पडला. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना तसेच सर्व पदाधिकाऱ्यांना रामनवमी दणक्यात आणि धुमधडाक्यात साजरी करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर मनसेकडून मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी रामनवमी साजरी करण्यात येत आहे. गेल्या वर्षी मशिदीवरील 'भोंगे हटाव' मोहीम हाती घेतली होती. ज्या मशिदीत भोंगे वाजतील त्या मशिदीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे आवाहन गेल्या पाडव्या मेळाव्याला राज ठाकरे यांनी केले होते.


मनसेची बॅनरबाजी : बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर माहीम परिसरात मनसेने मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी केली आहे. त्या बॅनरमधून सर्व राम भक्तांना तसेच नागरिकांना रामनवमीच्या शुभेच्छा देऊन 'गर्व से कहो हम हिंदू है' असा संदेश देखील झळकवण्यात आला आहे. मनसेने झळकवलेल्या बॅनरवर माहीम विधानसभेचे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार, उपविभाग अध्यक्ष मनीष चव्हाण, पक्ष नेते संदीप देशपांडे आणि शाखाध्यक्ष संकेत धनु यांच्यासह अनेक महिला पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.


'या' कारणामुळे लावले बॅनर :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधानसभेचे शाखा अध्यक्ष संकेत धनु यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, शिल्लक राहिलेल्या सेनेला हिंदुत्वाचा विसर पडलेला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत आम्ही रामनवमी धुमधडाकात साजरी करण्याचे ठरवले आहे. त्याप्रमाणे माहीम येथील कापड बाजारामधील राम मंदिरासमोर 'गर्व से कहो हम हिंदू है' अशा आशयाचे बॅनर लावले आहेत.

लाडू वाटप करण्यात येणार : राम जन्मोत्सव साजरा करून आज दुपारी 12 वाजता मनसे प्रभाग क्रमांक १९० तर्फे माहीम कापड बाजार इथे असलेले राम मंदिर तसेच कै. हिराबाई राम मंदिर (कॅडेल रोड) मध्ये लाडू वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्व शाखेतील महिला-पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तसेच राम भक्तांनी माहीम येथील कापड बाजार परिसरात असलेल्या राम मंदिरात उपस्थित राहून रामनवमी साजरी करावी, अशी विनंती संकेत धनू यांनी केली आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी बॅनरबाजी :दादरमधील शिवसेना भवनासमोर मनसेकडून मोठमोठे बॅनर्स लावण्यात आले होते. मनसेचे उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर्स लावले होते. 'महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री, हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे' असा उल्लेख या बॅनर्सवर करण्यात आला होता. तसेच हिंदू बांधवांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छाही देण्यात आल्या होत्या. राज ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून या बॅनर्सवर उल्लेख करण्यात आला होता.

हेही वाचा : Ram Navami 2023 : काय आहे रामनवमीचा इतिहास, का साजरी करण्यात येते रामनवमी

ABOUT THE AUTHOR

...view details