महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अयोध्येचा निकाल ऐकायला बाळासाहेब हवे होते - राज ठाकरे

अयोध्या येथील वादग्रस्त जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरे

By

Published : Nov 9, 2019, 3:52 PM IST

मुंबई- अयोध्या येथील वादग्रस्त जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल पाहण्यासाठी बाळासाहेब ठाकरे हवे होते. त्यांना अतिशय आनंद झाला असता, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

आजचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे. अयोध्येतील आपल्या राम मंदिरासाठी कारसेवकांनी जे बलिदान केले त्याचे आज सार्थक झाले. देशातील बहुसंख्य जनतेच्या मनातील भावना आणि वास्तव लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. त्याचे मनापासून अभिनंदन करत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. तसेच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले.

ABOUT THE AUTHOR

...view details