मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेचा 'मेगा प्लॅन' - मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२१ न्यूज
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर कल्याण-डोंबिवलीत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गळती लागली. ही गळती दुसऱ्या ठिकाणी लागू नये, यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली.
मुंबई -ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर कल्याण-डोंबिवलीत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गळती लागली. ही गळती दुसऱ्या ठिकाणी लागू नये, यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी मुंबईत लोकसभानिहाय एक नेता आणि एक सरचिटणीस यांची कमिटी मनसेने तयार केली आहे.
मुंबईत मनसेची असलेली ताकद पुन्हा निर्माण करण्यासाठी काही योजना पक्षाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अभिजित पानसे, अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर, सरचिटणीस संजय नाईक, राजा चौगुले या बैठकीला उपस्थित होते.
लोकसभेत जाऊन कमिटी घेणार आढावा
पक्षाची वाढ आणि संघटनात्मक बांधणीसह विविध मुद्द्यांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली. मुंबईत लोकसभानिहाय एक नेता आणि एक सरचिटणीस यांची कमिटी तयार करण्यात आली आहे. ही कमिटी त्या लोकसभेत जाऊन आढावा घेणार आहे. त्याचा अहवाल 25 फेब्रुवारीपर्यंत राज ठाकरे यांना देण्यात येणार आहे, असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितलं.
मुंबईच्या बाहेर ही कमिटी
मुंबईत ज्याप्रकारे कमिटी तयार करण्यात येणार आहे, तशी कमिटी ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण डोंबिवली या ठिकाणासाठी देखील तयार करण्यात येणार आहे.
लोकसभा मतदारसंघनिहाय मनसेची समिती
1) उत्तर मुंबई
बाळा नांदगावकर – नेते, मनसे
संजय नाईक – सरचिटणीस, मनसे
2) उत्तर मध्य
संजय चित्रे – नेते, मनसे
राजा चौगुले – सरचिटणीस, मनसे
3) उत्तर पश्चिम
शिरीष सावंत – नेते, मनसे
आदित्य शिरोडकर – सरचिटणीस, मनसे
4) दक्षिण मध्य
अविनाश अभ्यंकर – नेते, मनसे
नयन कदम – सरचिटणीस, मनसे
5) दक्षिण मुंबई
नितीन सरदेसाई – नेते, मनसे
मनोज चव्हाण – सरचिटणीस, मनसे
6) उत्तर पूर्व
अमित ठाकरे – नेते, मनसे
संदीप देशपांडे – सरचिटणीस, मनसे