मुंबई : मणिपूर हिंसाचार प्रकरणी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारने मणिपूरमधील हिंसाचार ( Manipur violence ) लवकरात लवकर थांबवावा, अन्यथा मणिपूरसह ईशान्य भारत देशापासून वेगळे होण्याच्या विचाराला वेग येईल. याला केंद्र सरकार जबाबदार असेल, असे राज ठाकरे ( Raj Thackeray letter to PM Modi ) यांनी पत्रात लिहिले आहे. मणिपूरमधील सध्याचे नेतृत्व परिस्थिती हाताळण्यात कुचकामी ठरत असेल, तर भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने योग्य तो निर्णय घ्यावा, असा सल्लाही राज ठाकरेंनी या पत्रात दिला आहे.
राज ठाकरेंनी नेमके काय म्हटले पत्रात? :राज ठाकरे यांनी ( MNS president Raj Thackeray ) पत्रात म्हटले आहे की, “ईशान्य भारतातील मणिपूर राज्य असंतोषाने ग्रासले आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याच्या घरावर काही नागरिकांनी हल्ला केल्याने परिस्थिती रसातळाला गेली आहे. हा सर्व प्रकार गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असूनही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात केंद्र सरकार अपयशी का ठरत आहे? हे कळत नाही."असा सवाल ठाकरे यांनी पत्रातून मोदींना विचारला आहे.
तर.. मोदी सरकार जबाबदार :"जर मणिपूरचे सध्याचे नेतृत्व परिस्थिती हाताळण्यात कुचकामी ठरत असेल, तर भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. अटलबिहारी वाजपेयींनी ईशान्येला आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. पण आता मणिपूरकडे दुर्लक्ष का केले जात आहे? हे पाहता वाजपेयींचे सर्व प्रयत्न व्यर्थ जातील, अशी भीती व्यक्त होत आहे. मणिपूरला वेळीच शांत न केल्यास मणिपूरमधील लोकांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. फक्त मणिपूरमध्येच नाही तर ईशान्य भारतालाही या घटनेमुळे धोका निर्माण होईल. असे झाल्यास याला केंद्रातले मोदी सरकार जबाबदार असेल. त्यासाठी 'मी' पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना ठोस पावले उचलण्याची विनंती करतो'; असे पत्र राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहांना लिहले आहे.