महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अजित पवार यांचं वक्तव्य खेदजनक, पवारांच्या पीएचडी वक्तव्यावर मनसेची पोस्ट - PhD

MNS on Ajit Pawar : पीएचडी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत अजित पवारांनी केलेल्या विधानावर मनसेनं प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांचं वक्तव्य खेदजनक तसंच तितकंच संतापजनक असल्याचं मनसेनं म्हटलं आहे.

MNS on Ajit Pawar
MNS on Ajit Pawar

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 13, 2023, 10:58 PM IST

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (12 डिसेंबर) विधानपरिषदेत पीएचडीबाबत केलेल्या वक्तव्यावरून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसंच राज्यात विविध ठिकाणी संशोधक विद्यार्थ्यांनी अजित पवारांविरोधात अक्रमक भूमिका घेतली आहे. "विद्यार्थी पीएचडी करून दिवे लावणार आहेत का?" असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. अजित पवार यांच्या वक्तव्यावरुन विरोधकांनी देखील त्यांचा समाचार घेतला आहे. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेंही प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांचं वक्तव्य खेदजनक तसंच तितकंच संतापजनक असल्याचं मनसेनं म्हटलं आहे. याबाबत त्यांनी एक्स (ट्विटर) वर पोस्ट करून अजित पवारांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.

हजारो कोटी रुपये जाहिरातींवर खर्च :या पोस्टमध्ये मनसेनं म्हटलंय की, हजारो कोटी रुपये जाहिरातींवर खर्च करण्यात येत आहे, शेकडो कोटी रुपये मंत्र्यांच्या दालनांवर खर्च करणं म्हणजे निधीचा अपव्यय आहे, असं सरकारला वाटत नाही का?. पण जर बहुजन समाजातील मुलांनी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मागितली, तर तो खर्च नकोसा का मानला जातो? असा सवाल मनसेनं सोशल मीडिया पोस्टद्वारे विचारला आहे.

मंत्र्यांची आलिशान घरे :मनसेनं पोस्टमध्ये पुढं म्हटलं आहे की, “सरकारकडं जाहिराती, मंत्र्यांची आलिशान घरे, गाड्या, बंगले यावर भरमसाट खर्च करायला निधी आहे. मात्र, बहुजन समाजातील मुलं सारथी, महाज्योती, बार्टी या संस्थांकडून उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मागत असतील, तर उपमुख्यमंत्री म्हणतात, 'तुम्ही पीएचडी करून काय दिवे लावणार?' हे दुःखद, तितकंच संतापजनक आहे.

काय म्हणाले होते अजित पवार? :मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात फेलोशिपबाबत सतेज पाटील यांनी सरकारला प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांची जीभ घसरली. "विद्यार्थी संशोधन करुन काय दिवे लावणार?" असा सवाल अजित पवार यांनी केला होता. या विद्यार्थ्यांनी फेलोशिपऐवजी एमपीएससीसह आयएएस, आयपीएस, आयआरएस सारख्या इतर स्पर्धात्मक परीक्षांसाठी प्रयत्न करावेत", असं ते म्हणाले होते.

हेही वाचा -

  1. शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्याकडून ऐका संसदेत पिवळा धूर सोडण्याच्या घटनेची पूर्ण कहाणी
  2. संसदेत उड्या मारणारे युवक महुआ मोइत्रांची माणसं - खासदार नवनीत राणा
  3. 'या' सहा जणांनी मिळून रचला कट, सोशल मीडियावरून होते संपर्कात

ABOUT THE AUTHOR

...view details