मुंबई - शहरातील घाटकोपर पश्चिम येथील सर्वोदय एसटी थांबा निष्कासित केला. मात्र, ४ महिने उलटल्यानंतरही या थांब्याचे बांधकाम केले नाही. त्यामुळे आता, या प्रकरणात मनसेने उडील घेऊन याच ठिकाणी नवीन थांब उभा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
घाटकोपरच्या एस. टी. थांबा प्रकरणात मनसेची उडी - ghatkopar
बस थांबा तोडण्याचे काम हाती घेतले. त्यावेळी स्थानिक नगरसेवकांना याची माहिती पाहीजे होती. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. कारण या बस थांब्याच्या मागे मोठ्या विकासकाचे काम चालू आहे. विकासकाला एसटी थांब्याची अडचण होत असल्याने थांब तोडण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष दशरथ भि. शिर्के यांनी केला.
![घाटकोपरच्या एस. टी. थांबा प्रकरणात मनसेची उडी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3211131-thumbnail-3x2-mns.jpg)
लाल बहादूर शास्त्री मार्गावर सर्वोदय रुग्णालयाच्या जवळ ३० वर्षांपेक्षाही जास्त जुना बस थांबा होता. पालिकेने गेल्या डिसेंबर महिन्यात रस्ता रुंदीकरणाचे कारण पुढे करीत तो थांबा निष्कासित केला. मात्र, अद्यापही त्याचे बांधकाम झाले नाही. एसटी थांबा पुनर्विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन घाटकोपर प्रगती मंच सदस्यांनी केले होते. त्यासाठी आज सर्व पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक नागरीक, पालिका एन. वॉर्डला एकत्र येत उपायुक्त रणजित ढाकणे यांना निवेदन दिले. यावेळी मनसेनेदेखील आपली भूमिका स्पष्ट केली.
बस थांबा तोडण्याचे काम हाती घेतले. त्यावेळी स्थानिक नगरसेवकांना याची माहिती पाहीजे होती. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. कारण या बस थांब्याच्या मागे मोठ्या विकासकाचे काम चालू आहे. विकासकाला एसटी थांब्याची अडचण होत असल्याने थांब तोडण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष दशरथ भि. शिर्के यांनी केला. तसेच याठिकाणी मनसे घाटकोपरतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.