महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'हिंदूहृदयसम्राट' नावाचे फलक काढण्याचे राज ठाकरेंचे आदेश; अवघ्या ५ मिनिटात आटोपली बैठक

'हिंदूहृदयसम्राट' ही उपाधी असलेले माझे फलक लावणे बंद करा, अशी सूचना राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांनी केली. मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सर्वप्रथम या आशयाचे बॅनर ठाण्यात लावले होते. या बॅनरवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

raj thakare
मनसे अध्यक्ष राज ठाकरे

By

Published : Jan 27, 2020, 12:08 PM IST

Updated : Jan 27, 2020, 2:10 PM IST

मुंबई - पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना भारतातून परत पाठवण्याच्या मागणीसाठी मनसे येत्या ९ फेब्रुवारीला मोर्चा काढणार आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी रंगशारदामध्ये आयोजित बैठक राज ठाकरेंनी अवघ्या ५ मिनिटांत आटोपली. मनसेच्या नेत्यांना पुढील भूमिका ठरवण्याचे आदेश देऊन ते रवाना झाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

हेही वाचा - 'केवळ नाव घेतल्याने कोणी हिंदूहृदयसम्राट होत नाही'

प्रकृती अस्वास्थ्यामुळे ठाकरे बैठकीलाही उशिरा पोहोचले. 'हिंदूहृदयसम्राट' ही उपाधी असलेले माझे फलक लावणे बंद करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिल्या. मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सर्वप्रथम या आशयाचे फलक ठाण्यात लावले होते. या फलकावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. शिवसेनेत असतानाही राज ठाकरे यांची पाकिस्तानी आणि बांगलादेशींविरोधात भूमिका होती, अशी आठवण मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी यावेळी करून दिली. लवकरच शॅडो कॅबिनेट जाहीर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - मुंबईत जन्मलेला मुख्यमंत्री तुम्हाला मिळाला, मला मुंबईच्या प्रश्नांची जाण - मुख्यमंत्री

Last Updated : Jan 27, 2020, 2:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details