मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक आज मुंबईतल्या रंगशारदामध्ये पार पडली. यामध्ये येत्या ९ फेब्रुवारीला काढण्यात येणाऱ्या मोर्चाविषयी चर्चा झाली. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबतची माहिती दिली.
मनसेच्या बैठकीत 9 फेब्रुवारीच्या मोर्चाची चर्चा.. शॅडो कॅबिनेटची घोषणाही लवकरच
या मोर्चाच्या तयारीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची बैठक पार पडली. या मोर्चासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. मोर्चाचा मार्ग ठरवला जात असून, मोर्चाची समाप्ती आझाद मैदान येथेच होणार असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.
मनसे नेते बाळा नांदगावकर
बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना परत पाठवण्यासाठी मनसेकडून ९ फेब्रुवारीला मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची बैठक पार पडली. या मोर्चासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. मोर्चाचा मार्ग ठरवला जात असून, मोर्चाची समाप्ती आझाद मैदान येथेच होणार असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.
सोशल मीडियावर आणि काही बॅनरवर राज ठाकरे यांना हिंदूहृदयसम्राट म्हणून संबोधले गेले आहे. मात्र, मला हिंदूहृदयसम्राट म्हणून नका, अशा सूचना राज ठाकरे यांनी केल्याचे नांदगावकर यांनी सांगितले. मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सर्वप्रथम या आशयाचे फलक ठाण्यात लावले होते. या फलकावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. शिवसेनेत असतानाही राज ठाकरे यांची पाकिस्तानी आणि बांगलादेशींविरोधात भूमिका होती, अशी आठवण मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी यावेळी करून दिली. लवकरच शॅडो कॅबिनेट जाहीर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.