मुंबई -महाविकास आघाडी सरकारने काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा राजकारण तापल आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील सुरक्षा कमी करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मनसे कार्यकर्ते नाराज आहेत. आता मनसे कार्यकर्तेच राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवणार आहेत. आज बांद्रा येथे मनसेची राजस्तरीय बैठक आहे. यावेळी 'महाराष्ट्र रक्षक' या आशयाचे टीशर्ट घातलेले कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत.
राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी मनसेचे महाराष्ट्र रक्षक पथक
मनसे कार्यकर्तेच राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवणार आहेत. आज बांद्रा येथे मनसेची राजस्तरीय बैठक आहे. यावेळी महाराष्ट्र रक्षक या आशयाचे टीशर्ट घातलेले कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत.
राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी मनसेचे महाराष्ट्र रक्षक पथक
काय आहे सुरक्षेचे पूर्ण प्रकरण
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत कपात करण्याबरोबरच ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीही काढून घेतली जाणार आहे. फडणवीस यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांना झेड श्रेणीची सुरक्षा आहे. त्याऐवजी आता वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.