महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सीएए'मध्ये गैर काय, माझा देश म्हणजे धर्मशाळा नव्हे - राज ठाकरे - मनसे महामोर्चा पोलिसांचा चोख बंदोबस्त

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या नागरीकत्व सुधारणा कायद्याबद्दल बोलताना,  माझा देश म्हणजे धर्मशाळा आहे का? कुठूनही येतात आणि आपल्या देशात घुसखोरी करतात. बेरोजगारी आणि अन्य महत्त्वाचे मुद्दे आहेत तसंच घुसखोरीवरचं संकट हा महत्त्वाचा प्रश्न असून ज्यांच्याकडे एनआरसीबद्द पुरावे नाहीत त्यांनी देशातून चालतं व्हावे असा, इशारा राज यांनी दिला आहे.

mns president raj thackreay
मनसे अध्यक्ष राज ठाकरे

By

Published : Feb 9, 2020, 10:27 AM IST

Updated : Feb 9, 2020, 4:57 PM IST

मुंबई -

LIVE :

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे -

⦁ आज मोर्चाला मोर्चाने उत्तर दिलं आहे, उद्या दगडाला दगडाने उत्तर आणि तलवारीने तलवारीला उत्तर मिळेल...देशातील सीएए आणि एनआरसी विरोधात मोर्चा काढणाऱ्यांना इशारा...
⦁ राज्य सरकारला सांगण्यात काही अर्थ नाही, केंद्र सरकारकडेच गेलं पाहिजे...
⦁ एनआरसीबद्दल ज्यांच्याकडे पुरावे नाहीत त्यांना हाकलूनच दिले पाहिजे.
⦁ माझा देश म्हणजे धर्मशाळा आहे का? कुठूनही येतात आणि आपल्या देशात घुसखोरी करतात. बेरोजगारी आणि अन्य महत्त्वाचे मुद्दे आहेत तसंच घुसखोरीवरचं संकट हा महत्त्वाचा प्रश्न आहे
⦁ केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेचं अपयश झाकण्यासाठी हा कायदा आणला असेल तर हे अत्यंत चुकीचे आहे... कायदा लागू करणार असेल तर कडक अंमलबजावणी करा
⦁ अनेक मराठी मुसलमान तिथे दंगली होत नाही जिथे बाहेरून येत आहेत तिथे गैरप्रकार होतात. फक्त बांग्लादेशी मुसलमान नाही तर नायजेरियन घुसखोरांनी वसई-विरार-मिरा-भाईंदर इथे उन्माद घातला आहे.
⦁ जिथं मराठी मुस्लिम राहतात तिथं आजपर्यंत दंगली झालेल्या नाहीत...कारण त्यांचा जन्म इथल्याच मातीमध्ये झाला आहे.
⦁ भारतानेच काही माणुसकीचा ठेका घेतलेला नाही...
⦁ सध्या देशात फक्त दोन भूमिकांमधून पाहिलं जातं. सरकारवर टीका केली तर भाजपविरोधी, अभिनंदन केलं तर समर्थक. ठोस भूमिका म्हणून काही आहे की नाही. तीच आम्ही घेतो.
⦁ कोणतेही कायदे समजून न घेता ताकद दाखविण्यासाठी जे मोर्चे काढले गेले त्यांना तुम्ही आज चोख प्रत्युत्तर दिलंत.

  • 04.30 pm - पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा अड्डा
  • 04.26 pm - राज ठाकरेंच्या भाषणाला आझाद मैदान येथून सुरुवात..
  • 03.53 pm - मनसेप्रमुख राज ठाकरे आणि युवा नेते अमित ठाकरे यांचे आझाद मैदानावर दाखल...
  • 03.08 PM - राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते मोर्चात सहभागी... कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह
  • 02.58 PM - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदू जिमखाना येथे दाखल... मोर्चा आझाद मैदानाकडे रवाना
  • 02.52 PM - हिंदू जिमखाना काही अंतरावर असताना राज ठाकरे गाडीतून उतरून पायी मार्गस्त
  • 01.41 PM - राज ठाकरे सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर... हिंदू जिमखान्याकडे रवाना
  • 01:34 PM - राज ठाकरे सिद्धिविनायकचरणी पोहोचले
  • 01:27 PM - मनसे अध्यक्ष राज ठाकरे कृष्णकुंजवरून रवाना... सुरुवातीला घेणार सिद्धिविनायकाचे दर्शन
  • 12.59 PM - आजचा दिवस आनंददायक - अभिजित पानसे (मनसे नेते)... इतक्या मोठ्या प्रमाणात लोक मोर्चात सहभागी हा आमच्याासाठी शुभशकून... मुद्द्याचा मोर्चा राजकीय नाही... तर हा देशाचा अजेंडा असला पाहिजे... बाळासाहेबांचीही हीच भूमिका होती...
  • 12.40 PM - मनसे नेते मोर्चा स्थळी पोहचण्यास सुरुवात... माजी आमदार नितीन सरदेसाई, संदिप देशपांडे, अभिजित पानसे, आमदार राजू पाटील आदी मान्यवर हिंदू जिमखान्याजवळ... राज ठाकरे काय बोलणार त्याकडे सर्वांचे लक्ष...
  • 12.35 PM - आम्ही भगवा कधीच सोडला नाही - शर्मिला ठाकरे
  • 12:33 PM - गिरगाव चौपाटीजवळ मनसेची पाकिस्तानी, बांगलादेशी नागरिकांविरोधात घोषणाबाजी... मनसेचा नवा भगवा आणि भारतीय तिरंगा झेंडा घेऊन मनसेचे कार्यकर्ते गिरगांव येथील हिंदू जिमखान्याजवळ जमू लागले...
  • 12.15 PM - हा मोर्चा मनसेच्या बदललेल्या विचारसरणीतून - उदय सामंत (उच्च व तंत्र शिक्षणमंत्री)... या मोर्चाचा निकाल आगामी निवडणूकीनंतरच कळेल... हर्षवर्धन जाधव मनसेत गेल्यावर काहीही फरक पडणार नाही... तर राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यानंतरच दिल्लीत जाण्याचा विचार हे फडणवीसांचे विधान नैराश्यातून
  • 12.12 PM - शिवसेनेने त्याचं बघावे, आम्हाला शिकवू नये - राजू पाटील (आमदार, मनसे)... डोंबिवलीतून 10 ते 15 हजार कार्यकर्ते मोर्चात सहभागी होणार
  • 12.07 PM - कोण कुणाला पुरस्कृत करत आहे हे शिवसेनेलाच ठाऊक - प्रकाश महाजन (मनसे नेते)...आम्ही चांगल्या गोष्टींना पाठिंबा देतो...
  • 12:03 PM - मनसे महामोर्चा साठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त... ईस्टर्न फ्री वे वरून येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून तपासणी
  • 12.01PM - मोर्चामुळे काय फरक पडेल हे आगामी काळात कळेलच - नितीन सरदेसाई... 1 तासानंतर मोर्चाला सुरूवात... मनसेच्या नेहमीच्या मोर्चाप्रमाणेंच हा मोर्चाही भव्य असेल... आजच्या मोर्चाचा विषय देशहिताचा... जे सहमत ते सहभागी होतील...
  • 11.43 PM - 1 वाजल्यानंतर मोर्चाला सुरुवात होणार - बाळा नांदगावकर, 13 वर्षे आमचा भाजपने चालवला का? बाळानांदगावकरांचा शिवसेनेला प्रतिसवाल... शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली आहे... वेगवेगळ्या संघटनातील देशप्रेमी लोक मोर्चात सहभागी होणार... सध्या गलिच्छ राजकारण सुरू आहे म्हणून राज ठाकरेंकडे एक नवीन आशेचा किरण म्हणून पाहिले जातेय.. पक्षप्रमुख राज ठाकरे, पक्षाचे नेते अमित ठाकरे सहकुटूंब मोर्चात सहभागी होणार... नांदगावकरांच्या पत्नीही मोर्चात सहभागी... वेगवेगळ्या राज्यातील लोकांचे फोन करून महामोर्चाला समर्थन... राज ठाकरेंना वाटले हिंदुत्वाकडे जाणे ही व्यापक भूमिका... छत्रपतींचीही अशीच भूमिका होती... आम्ही कुणाचे हिंदुत्व हायजॅक करत नसल्याचेही नांदगावकरांचे स्पष्टीकरण
  • 11.40 PM - थोड्याच वेळात होणार मोर्चाला सुरुवात
  • 11.36 PM - संपूर्ण ठाणे शहरातून 78 बसेस मधून कार्यकर्ते दाखल होणार
  • 11.15 PM - राज्यभरातून मनसैनिक मुंबईत दाखल
  • 10:40 PM - मनसेच्या मोर्चाला भाजपचे पाठबळ - मनिषा कायंदे (शिवसेना नेत्या)
  • तर ज्यांचे सरकार अजित पवार चालवतात त्यांनी आम्हाला शिकवू नये - अविनाश जाधव (मनसे नेते)
  • 10:27 PM - ठाण्यातही मोर्चापूर्वी महाआरती
  • 10:25 PM - दादरच्या राममंदिरात केली महाआरती
  • 10:20 PM - मनसेचे पदाधिकारी भगव्या कपड्यांमध्ये

अवैधरित्या देशात राहत असलेल्या पाकिस्तानी आणि बांग्लादेशी मुस्लीम नागरिकांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा महामोर्चा निघणार आहे. या महामोर्चाला हिंदू जिमखाना येथून सुरुवात होईल. यानंतर हा मोर्चा मरीन ड्राइव मार्गे आझाद मैदानात पोहोचणार आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे जनसभेला संबोधित करतील. या महामोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

असा असेल मनसेच्या महामोर्चाच्या मार्ग

हेही वाचा -शिवसेनेत बच्चू कडू विरुद्ध अब्दुल सत्तार, ...तो अधिकार सत्तारांना नाही

या मोर्चासाठी स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त राज्य राखीव पोलीस दल, दंगा नियंत्रण पथक, त्वरित कार्य दल, बॉम्ब विरोधी पथक आणि 600 अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यावेळी ड्रोन कॅमेरा आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुद्धा या मोर्चावर लक्ष ठेवण्यात येणार आहेत. तसेच साध्या वेशांमध्ये सुद्धा पोलीस राहणार आहेत, अशी माहिती मुंबई पोलीस प्रवक्त्यांनी दिली आहे.

मनसेचा आज घुसखोरांविरोधात महामोर्चा

मनसेचे महाअधिवेशन गेल्या महिन्यात पार पडले. या अधिवेशनात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या नागरी सुधारणा कायद्याबद्दल बोलताना, घुसखोरांना आपला विरोध असल्याचे सांगितले होते. तसेच यांच्याविरोधात महामोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती.

मनसेचा घुसखोरांविरोधात महामोर्चा
Last Updated : Feb 9, 2020, 4:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details