मुंबई -वरळी विधानसभा क्षेत्रात एका पबमध्ये कोरोनाच्या नियमाचा फज्जा उडवला जात असल्याचा प्रकार मनसेचे नेते संतोष धुरी यांनी समोर आणला आहे. वरळीतले पब रात्रीचे १२-१ वाजेपर्यंत कसे काय सुरू असतात. यांना कोण परवानगी देतं?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. मात्र काही ठिकाणी या आवाहनाला हरताळ पोहोचवली जात आहे. असाच एक व्हिडीओ मनसे नेते संतोष धुरी यांनी समोर आणला आहे.
मनसेचे नेते संतोष धुरी यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. वरळी येथील एका पबमध्ये कशाप्रकारे नियमांची पायमल्ली करण्यात येत आहे, हे धुरी यांनी त्या व्हिडिओद्वारे दाखवले आहे. यानंतर त्यांनी शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात सर्व नियम धाब्यावर बसवले जातात आणि मुख्यमंत्री सर्वसामान्यांना कोरोना गेलेला नसल्याचं सांगतात. सामान्य लोकांसाठी कोरोना आहे. पण श्रीमंतासाठी कोरोना नाही. युवराज आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील ही परिस्थिती आहे, असेही धुरी यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -महिन्याच्या सुरवातीलाच गॅस सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ
हेही वाचा -मुंबई : वरळीतील पब, बारवर होणार कारवाई - मंत्री अस्लम शेख