मुंबई -राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरोना काळातील वाढीव वीज बिलातून ग्राहकांना दिलासा देण्याच्या मुद्यावरुन पलटी मारली. यानंतर ग्राहकांमध्ये संतापाची भावना आहे. या मुद्यावरुन विरोधी पक्षाने महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी टाकली आहे. मनसेने आता मात्र संघर्ष करावाच लागेल, असे म्हणत महाविकास आघाडी सरकारला इशाराच दिला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी वीज बिल मुद्यावरुन एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. 'वीज बिलासंदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल. कारण लाथो के भूत बातों से नही मानते, अशा शब्दात देशपांडे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.
काय आहे प्रकरण?