मुंबई -मुंबईतील सर्वात मोठे असलेल्या बीकेसी जम्बो कोविड सेंटरवर मनसेने गंभीर आरोप केले होते. याबाबत बीकेसी कोविड सेंटरची परिस्थिती १ आठवड्यात सुधारली नाही तर मनसे स्टाइल आंदोलन करू, असा इशारा सरकार आणि पालिकेला दिला होता. आज मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्त्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने बीकेसीचे प्रमुख राजेश ढेरे यांची भेट घेतली. यावेळे संदीप देशपांडे आणि बीकेसी प्रशासन यांच्यात बाचाबाचीही झाली असल्याचे बोलले जात आहे.
'बीकेसीमध्ये उपचार रामभरोसे'
'बीकेसीमध्ये अनुभवी डॉक्टरांची कमतरता आहे. या ठिकाणी उपचार रामभरोसे चालले आहेत, असा आरोप मनसेकडून मागच्या आठवड्यात करण्यात आला होता. एक आठवड्याचा अवधी आम्ही सेंटरला देत आहोत. त्यांनी लवकरात लवकर उत्तर द्यावे', अशी भूमिका मनसेने घेतली होती. परंतु बीकेसी सेंटरकडून कोणतेही उत्तर न आल्याने आज मनसे आक्रमक झाली. त्यांनी बीकेसी कोविड सेंटरला भेट दिली.