मुंबई :कोरोना काळामध्ये अनेक प्रकारच्या नियमबाह्य गोष्टी मुंबई महानगरपालिकेमध्ये घडल्या. या भ्रष्टाचारामुळेच मुंबई महानगरपालिका पोखरली गेली. म्हणून कोरोना काळामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराला उघड करणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. मुंबई महानगरपालिका दोन महिन्याच्या अंतराने येऊन ठेपल्या आहे. त्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे मुंबईतील मनसेचे नेते यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
घोटाळे आता बाहेर :संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटलेले आहे की, चंदन तस्कर डाकू वीरप्पन याने जंगलातील लाकडू लाकडाच्या तस्करीमुळे जसे तिथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट केली. जमिनीची लूट करत असताना जनतेची देखील लूट केली. त्याचप्रकारे मुंबई महानगरपालिकेला तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी लुटलेले आहे. जनतेच्या जीवाची परवा न करता जनतेने भरलेला कर महानगरपालिकेने असा उधळ हस्ते उधळला. त्यामुळेच या टोळीचे एक एक घोटाळे आता बाहेर काढण्याचे काम महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे करणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटले.
कोरोना काळात भ्रष्टाचार :संदीप देशपांडे यासंदर्भात म्हणतात, की आपण भ्रष्टाचाराच्या अनेक कथा ऐकतो, विविध प्रकार पाहतो. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी कोरोनाच्या काळामध्ये अशा प्रकारच्या भ्रष्टाचार केलेला आहे. की तो भ्रष्टाचार तुम्हाला ऐकून पाहून नवल वाटेल. याचे कारण चेकने जो व्यवहार केला जातो. धनादेश जो अधिकृत बँकेमध्ये वटवला जातो. त्या माध्यमातून देखील भ्रष्टाचार केलेला आहे. हा काळा व्यवहार आम्ही उघडकीस आणू आणि त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि हे पुरावे आम्ही पुढील दोन दिवसात माध्यम आणि जनतेसमोर मांडू असे देखील त्यांनी नमूद केले.