मुंबई -दिल्लीत बसून महाराष्ट्र्रातील मुले पुढे कशी जातील? याचा विचार करावा. दिल्लीत बसून परप्रांतीयांचे गोडवे गाणे बंद करा, अशा शब्दांत मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना सुनावले आहे. एका व्हीडिओतून त्यांनी सावंतांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अरविंद सावंत यांनी स्थलांतरित कामगारांचे व त्यांच्या रिव्हर्स मायग्रेशनप्रकरणी कामगारांचे स्वागत केले होते. त्यामुळे सरदेसाई यांनी सावंताचा खरपूस समाचार घेतला आहे.
दिल्लीत बसून परप्रांतीयांचे गोडवे गाणे बंद करा, नितीन सरदेसाईंनी अरविंद सावंतांना सुनावले - परप्रांतीय मजुरांबाबत अरविंद सावंत
महाराष्ट्रातील तरुणांच्या काम करण्याच्या क्षमेतवर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. परप्रांतीय मजुरांची स्तुती करूनच तुम्ही थांबले नाहीत, तर तुम्ही महाराष्ट्रात या स्वागत आहे, असे वक्तव्य केले. आपण मुंबईचे महाराष्ट्राचे खासदार आहात हे विसरू नका? अशी आठवणही सरदेसाई यांनी सावंतांना करून दिली.
मुंबई व महाराष्ट्रात आजही मोठ्या संख्येने तरुण बेरोजगार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाखोंच्या संख्येने स्थलांतरित कामगार उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमध्ये गेले आहेत. त्यामुळे आता स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करण्याची संधी आहे. त्यांना प्रोत्साहन देऊन रोजगार मिळवून देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रतील तरुणांच्या काम करण्याच्या क्षमेतवर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. परप्रांतीय मजुरांची स्तुती करूनच तुम्ही थांबले नाही, तर तुम्ही महाराष्ट्रात या स्वागत आहे, असे वक्तव्य केले. आपण मुंबईचे महाराष्ट्राचे खासदार आहात हे विसरू नका? अशी आठवणही सरदेसाई यांनी सावंतांना करून दिली.
सावंत हे मुंबईतून निवडून गेले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेश, बिहारचे प्रतिनिधित्व करू नये, तर आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना प्रोत्साहन, प्रशिक्षण देऊन त्यांना मार्गी लावण्यासाठी दिल्लीतून प्रयत्न करावेत, असे सरदेसाई यांनी म्हटले.