मुंबई - लॉकडाऊनचे दिवस जसजसे वाढायला लागले तसे अनेक मुंबई परिसरात राहणाऱ्या वृद्ध नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत. त्यांच्याकडे जेवण बनवण्यासाठी येणारे स्वयंपाकी बंद झाल्यामुळे या ज्येष्ठ नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मनसेने अशा अडचणीत असलेल्यांसाठी राज ठाकरे यांच्या आदेशाने 'मनसे अन्नपूर्णा' ही वृद्धांसाठी योजना आणली आहे.
लॉकडाऊन इफेक्ट : मनसेची ज्येष्ठ नागरिकांसाठी 'अन्नपूर्णा' योजना - ज्येष्ठ नागरिक मुंबई बातमी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे अनेक वृद्ध नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत. मनसेने अशा अडचणीत असलेल्यांसाठी राज ठाकरे यांच्या आदेशाने 'मनसे अन्नपूर्णा' ही वृद्धांसाठी योजना आणली आहे.
मनसेची ज्येष्ठ नागरिकांसाठी शिदोरी
या योजनेत मनसेचे उपाध्यक्ष आणि विभागप्रमुख यशवंत किल्लेदार यांनी दादर, प्रभादेवी, माटुंगा आणि माहिम या परिसरातील वृद्ध व्यक्तींसाठी सकाळ आणि रात्रीचे जेवण घरपोच सेवा सुरू केली आहे. यामध्ये चपाती, भाजी, भात, वरण याचा समावेश आहे.
मनसेचे कार्यकर्ते दररोज सकाळी संध्याकाळी अशा गरजू ज्येष्ठ नागरिकांना घरपोच ही सेवा देत आहेत. यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्याचा मनसेचा प्रयत्न असल्याचे मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.
Last Updated : Apr 9, 2020, 2:24 PM IST