मुंबई :लॉकडाऊन कालावधीत खासगी वीज कंपनी, बेस्ट महावितरण आदि शासकीय कंपन्यांनी वाढीव वीजबिल पाठवल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने या संवेदनशील विषयाकडे लक्ष देऊन ग्राहकांच्या वीजबिलात तत्काळ सूट द्यावी. असे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिले आहे. त्यात त्यांनी महावितरण बेस्ट या सरकारी आस्थापनाना व खासगी वीज कंपन्यांना कडक शब्दांत समज द्यावी असे म्हटले आहे. अन्यथा या कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल असा इशारा दिला आहे.
..अन्यथा 'या' कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल, राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र - raj thackeray news
लॉकडाऊन काळात विजेच्या वाढीव बिलासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. यात आधीच कोरोनामुळे संकटात सापडलेल्या नागरिक वाढीव वीजबिलामुळे अडचणीत आले असून नागरिकांना वीजबिलात तत्काळ सूट द्यावी, अन्यथा या कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल, असा इशारा दिला आहे.
मार्च ते मे या लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचे सरासरी वीजबिल पाठवल्यानंतर त्या तीन महिन्यांचा झालेला वापर यांच्यातील तफावत जून-जुलै महिन्यात ग्राहकांच्या माथी मारण्यात आली आहे. टाळेबंदीत जी आस्थापनं बंद होती त्यांनाही अव्वाच्या सव्वा वीजबिल पाठवण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. तर, अनेकांची पगार कपात सुरू असून काही आस्थापनांनी नोकर कपातही सुरू केली आहे. एकीकडे उदरनिर्वाहाची शाश्वती नसताना वीजबिल म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यावरच प्रहार करणं आहे, असे ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.
कोरोनाच्या परिस्थितीत राज्यातील जनता, राजकीय पक्ष हे सरकारच्या मागे ठामपणे उभे होते आणि भविष्यातही राहतील. पण अशा विषयांत मनसेना गप्प बसेल अशी चुकीची समजूत सरकारने करून घेऊ नये. हा विषय संवेदनशील आहे आणि सरकारही संवेदनशील पणे हाताळेल याची मला खात्री आहे. असा विश्वास देखील राज ठाकरे यांनी पत्राद्वारे व्यक्त केला.