मुंबई MNS on Manoj Jarange Patil : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा हिंसाचार उसळताना दिसत आहे. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराची आंदोलकांनी तोडफोड केली आणि नंतर घर पेटवून दिलं. (Raj Thackeray video on Maratha Protest) तर, दुसरीकडे मागील पाच दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चाललीय. एका बाजूला आंदोलन उग्र स्वरूप घेतंय तर दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे. अशात मनसेने मराठा समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घालत भावनिक (MNS Emotional Response to Maratha community) साद घातलीय.
मनसेच्या पेजवरून 'हे' आवाहन:मनसेचं अधिकृत सोशल मीडिया हँडल 'मनसे अधिकृत' या पेजवरून राज ठाकरे यांचा जुना व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनोज जरांगे पाटील यांच्यासह संपूर्ण मराठा समाजाला भावनिक साद घालण्यात आलीय. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'गड्यांनो महाराजांची आण हाय तुम्हास्नी... मोहीम फत्ते होईस्तर झुंजत राहू या... पर ह्या निबऱ्या पुढाऱ्यांपुढं आपल्या महाराष्ट्राचा ल्योक खर्ची पडता कामा नये!' याला मनसेने राज ठाकरे यांचा जुना व्हिडिओ जोडला आहे.